शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड : सातही वॉर्डांची मतदार यादी सदोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:42 IST

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेली सात वॉर्डांची मतदारयादी सदोष असून, अनेक ठिकाणी मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ पद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे तर पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत उघड झाला आहे.

देहूरोड - देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने प्रसिद्ध केलेली सात वॉर्डांची मतदारयादी सदोष असून, अनेक ठिकाणी मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ पद्धतीने, अर्धवट लिहिलेला तसेच काही नावांपुढे तर पत्ताच नसल्याचा धक्कादायक प्रकार ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत उघड झाला आहे. मतदारांचा संपूर्ण पत्ता लिहिण्याबाबत कॅन्टोन्मेंट निवडणूक नियम -२००७ नुसार स्पष्ट सूचना असतानाही संपूर्ण पत्ता लिहिण्याचे बहुतांश ठिकाणी टाळले असल्याचे दिसत असून, येत आहे. काही मतदारांचा पत्ता चक्क पुणे-मुंबई रस्ता असा लिहिलेला आहे. तसेच सरकारी जागांवरील अतिक्रमितांची नावे मतदार यादीत समाविष्ट न करण्याबाबत रक्षा संपदा विभागाचे स्पष्ट निर्देश असतानाही संबंधित भागातील घरक्रमांक लिहिले नसल्याने काही अतिक्रमितांची नावे यादीत असल्याची शक्यता आहे.देशातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका २००८ सालापासून ‘कॅन्टोन्मेंट निवडणुकांचे नियम २००७’ अन्वये होत आहेत. या नियमान्वये बोर्डाला मतदारयादीचा नमुना देण्यात आलेला आहे. त्यानुसार कागदावर डाव्या कोपऱ्यात वॉर्ड क्रमांक, उजव्या बाजूला भाग क्रमाक लिहिणे आवश्यक आहे. मात्र बोर्डाच्या वॉर्डनिहाय मतदारयादीत काही ठिकाणी तसा उल्लेख केलेला दिसत नाही. तसेच मतदाराचा अनुक्रमांक, मतदाराचे नाव, वय, लिंग, अनु. जाती जमाती व पूर्ण पत्ता घर क्रमांकासह लिहिणे आवश्यक असताना अनेक मतदारांचा राहण्याचा पत्ता ढोबळ तसेच अर्धवट लिहिला आहे. पत्त्यांच्या रकान्यात काही ठिकाणी फक्त गावांची नावे टाकली आहेत. तर काही ठिकाणी परिसराचे नाव लिहिले आहे. परिसराचे नाव टाकताना भरमसाठ चुका केलेल्या आहेत. काही ठिकाणी पत्ताच लिहिलेला नाही. तर पत्त्यात घर क्रमांक लिहिणे टाळले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्राथमिक मतदार यादीतील काही मतदार बोगस आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कॅन्टोन्मेंट बोर्डाने दरवर्षीप्रमाणे कॅन्टोन्मेंट निवडणूक नियम २००७ अनुसार १ जुलैला बोर्डाच्या हद्दीतील सातही वॉर्डांची वॉर्डनिहाय मतदार यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या मतदार यादीची पाहणी केली असता सातही प्रभागांतील मतदार यादी सदोष असून, मतदारांच्या पत्त्यांमध्ये भरमसाठ चुका असल्याच्या वॉर्डांत विविध ठिकाणी व दूर अंतरावर राहत असूनही एकच पत्ता (गावाचा अगर परिसराचा) दिल्याचा तसेच काहींच्या नावापुढे पत्ताच नसल्याचा प्रताप बोर्डाच्या काही प्रगणकांनी केला असल्याचे निदर्शनास आले आहे.सूचनांकडे काही प्रगणकांचे दुर्लक्षबोर्डाच्या हद्दीतील मतदारांचे पत्ते अचूक घेण्याबाबत मतदार यादी तयार करण्यापूर्वी बोर्ड कार्यालयात कार्यालय अधीक्षक श्रीरंग सावंत यांनी सर्व प्रगणकांना मतदारांची नावे व पूर्ण पत्ते अचूक लिहिण्याबाबत लेखी पत्राद्वारे सूचित केले होते. मात्र याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे मतदार यादी पाहून स्पष्ट होत आहे.सरकारी जागांवरील ज्या अतिक्रमितांच्या घरांची बोर्डाच्या महसूल विभागाकडे नोंद झालेली आहे. (ज्यांना मिळकत क्रमांक दिलेला आहे) त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत निर्देश असतानाही मिळकत / घरक्रमांक नसलेल्या मतदारांची नावे यादीत दिसत असल्याने सरकारी जागांवरील अतिक्रमितांच्या नावांबाबत संभ्रम निर्माण होत आहे.ढोबळ व अर्धवट पत्ते असलेला भागवॉर्ड क्र. १- घोरावडी, माळवाडी, शेलारमळा, शेलारवाडी काही भाग.वॉर्ड क्र. २ - मामुर्डी काही भाग, गायकवाड वस्ती, बुद्धविहार परिसर, मराठे वस्ती, काटे वस्ती, मेन रोड मामुर्डी.वॉर्ड क्र. ३ : गणेश चाळ, मेन बाजार, १ व २, सरदार पटेल रोड, आंबेडकरनगर, गांधीनगरचा काही भाग.वॉर्ड क्र. ४ - दांगट वस्ती, शिवाजीनगर, शंकर मंदिराजवळचा भाग.वॉर्ड क्र. ५ - संतोष स्वीटस, बी पी रोड, ई बी पी रोड भाग.वॉर्ड क्र. ६ - चिंचोलीतील भेगड ेचाळ, दाभाडे वाडा , बालघरे चाळ, जाधव आळी, पाटील चाळ, जाधव वाडा, बौद्ध वस्ती, हजारे मळा भाग .वॉर्ड क्र. ७ - किन्हई काही भाग, हगवणे मळा रेल्वेक्वॉर्टर भाग.व्यवस्थित पत्ते असलेला भागवॉर्ड क्र. १ -शेलारवाडी काही भाग, इंद्रायणी दर्शन. शितळानगर, थॉमस कॉलनी वॉर्ड क्रमांक दोन - बरलोटानगर, मामुर्डी काही भाग़वॉर्ड क्र. ३- आंबेडकरनगर, गांधीनगर काही भाग, बाजारपेठ काही भाग,वॉर्ड क्र. ४ - संकल्पनगरी, इंद्रप्रस्थ, एलोरा आदी भाग.वॉर्ड क्र. ५ - आयुध निर्माणी वसाहत, सिद्धिविनायकनगरी, श्रीविहार, श्रीनगरी.वॉर्ड क्र. ६ : चिंचोली काही भाग, दत्तनगर, समर्थनगरी व आशीर्वाद कॉलनीया भागातील मतदार यादी बनविणाºया प्रगणकांनी निवडणूक नियमाप्रमाणे काम केल्याने घरक्रमांकासह पूर्णपत्ता लिहिलेला दिसत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडElectionनिवडणूक