शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी अनुदानात झाली घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:22 IST

जीएसटी अनुदानापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आठ टक्के वाढीव दराने अनुदान देणे गरजेचे असताना राज्य सरकारकडून दोन महिन्यांपासून अनुदानात कपात केली जात आहे.

पिंपरी - जीएसटी अनुदानापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेला आठ टक्के वाढीव दराने अनुदान देणे गरजेचे असताना राज्य सरकारकडून दोन महिन्यांपासून अनुदानात कपात केली जात आहे. त्यामुळे महापालिकेचे आर्थिक नियोजन कोलमडणार असल्याची चिन्हे आहे. जीएसटी आणि एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारने जून महिन्यात दीडशे कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्यात जीएसटीचे सव्वाशे कोटी तर मुद्रांक शुल्काच्या दोन महिन्याच्या २६ कोटींचा समावेश आहे.पिंपरी-चिंचवड ही औद्योगिकनगरी आहे. जकात हे उत्पन्नाचे साधन होते. जकात बंद होऊन एलबीटी स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी बंद झाल्यापासून राज्य सरकारतर्फे महापालिकेला जीएसटीपोटी (वस्तू सेवा कर) अनुदान देण्यात येते. गतवर्षी सरासरी १२७ कोटी रुपयांचे अनुदान महापालिकेला मिळत होते. यंदाच्या आर्थिक वर्षांपासून त्यात कपात करण्यात आली आहे. जून महिन्यात महापालिकेला १२५ कोटी ५७ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्याच्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी २५ कोटी ८७ लाख रुपयांचे अनुदान वितरित केले आहे.शासनाकडून अनुदान कपात कायमपाच मे पूर्वी उत्पन्नाचा आढावा घेतला़ त्या वेळी दोन महिन्यांपासून १२८ कोटी येणे अपेक्षित असताना महापालिका तिजोरीत सव्वाशे कोटींचे अनुदान येत आहे. वर्षभर अनुदानाचा हप्ता कायम ठेवल्यास सुमारे सव्वाशे कोटींचा तोटा महापालिकेला सहन करावा लागणार आहे. जकात आणि एलबीटी करप्रणाली बंद होऊन राज्य सरकारने वस्तू व सेवाकर अर्थात, जीएसटी लागू केला आहे.महापालिकांना दरमहा जीएसटीचे अनुदान प्राप्त होते. गेल्या वर्षापासून महिन्याच्या सुरुवातीलाच राज्य सरकारकडून अनुदान वर्ग केले जाते. मार्च २०१८ पर्यंत महापालिकेला १०४६ कोटी अनुदान मिळत होते. दर वर्षी आठ ते दहा टक्के वाढ गृहीत धरून नवीन वर्षात सुमारे ११३० कोटी रुपये जीएसटी अनुदान प्राप्त होणे गरजेचे होते. त्याउलट वाढीव अनुदान तर नाहीच, म्हणजेच दरमहा १२८ कोटींऐवजी राज्य सरकारकडून १२५ कोटी अनुदान दिले जात आहे. ही तूट दरमहा तीन कोटी चाळीस लाख आहे.महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात उत्पन्नाच्या बाजूत आठ टक्के वाढ गृहीत धरून खर्चाचा अंदाज बांधला आहे. राज्य सरकारने १२५ कोटींचे अनुदान कायम ठेवल्यास महापालिकेच्या उत्पन्नात सव्वाशे कोटींची घट होणार आहे.

टॅग्स :GSTजीएसटीnewsबातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड