शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत मनी ट्रान्स्फरच्या प्रमाणात घट, इंटरनेट बँकिंगच्या वापरात होतेय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:20 IST

शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत.

पिंपरी : शहरात विविध ठिकाणी मोबाइल विक्री, दुरुस्ती दुकानांमध्ये आठवड्यातून एकदा शनिवारी अथवा रविवारी परराज्यात नातेवाइकांना पैसे पाठविण्यासाठी बँकांपेक्षा मनी ट्रान्स्फर केंद्रात मोठ्या रांगा दिसून येत असत. नोटा बंदीनंतर अशा रांगा कमी झाल्या आहेत. आता एखादी दुसरी व्यक्ती अशा केंद्रावर पैसे भरण्यासाठी आल्याचे दिसून येते.बांधकामावर काम करणारे मजूर, तसेच रोजंदारीवर काम करणारे असंघटित कामगार अशा केंद्रात जाऊन नातेवाइकांना पैसे पाठवितात. पोस्ट अथवा बँकेमार्फत पैसे पाठविणे वेळखाऊ ठरते. तातडीने रक्कम पोहोचत नाही.बनावट नोटा, बदलून त्या परप्रातांत पाठविण्यासाठी मनी ट्रान्स्फर केंद्रांचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकार शहरात निदर्शनास आला होता. बांग्लादेशाच्या सिमेवरून आणल्या जणाºया बनावट नोटा भारतीय चलनात वापरात आणून अर्थव्यवस्थेला बाधा पोहोचविण्याचा प्रकार केला जात होता. पिंपरी पोलिसांनी अशा संशयित परप्रांतीयांना बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यातील काहींनी कबुली दिली होती. पिंपरीतील झोपडपट्टीत राहणाºया परप्रांतीयांच्या घरात अशी बनावट नोटांची बंडले आढळून आली होती. नोटाबंदीनंतर बनावट नोटांचा चलनात आणणाºयांना अडचणी आल्या. परिणामी मनी ट्रान्सफर केंद्रातील गर्दी कमी झाल्याचे जाणवू लागले आहे.मनी ट्रान्स्फर केंद्राद्वारे जलद स्वरूपात पैसे पाठविणे शक्य होते. मनी ट्रान्स्फर केंद्रातून रक्कम पाठविण्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. विविध बँकांची मोबाइल अ‍ॅप्स असून प्रत्येक बँकेचे सेवा शुल्क वेगवेगळे आहे. मात्र कष्टकरी या अशिक्षित कामगार वर्गास अशा अ‍ॅपचा वापर करता येत नाही. त्यामुळे ते मनी ट्रान्स्फर केंद्रातच जाणे पसंत करतात. तेथील व्यक्तीच्या मदतीने रक्कम हस्तांतरित केले जाते. दोन महिन्यांपासून मनी ट्रान्स्फर केंद्रातील गर्दी कमी झाली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड