शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीकर माफीची घोषणा विरली हवेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 01:54 IST

चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.

पिंपरी : चिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती पंधरा दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यास पंधरा दिवस उलटून गेले असून, अद्याप शास्तीकर माफीबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजना, स्मार्ट सिटीतील कामांचे ई-भूमिपूजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ९ जानेवारीला झाले. त्या वेळी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील अनधिकृत बांधकामाची शास्ती १५ दिवसांत माफ करू, असे आश्वासन दिले होते. कॅबिनेटमध्ये चर्चा करून १५ दिवसांत निर्णय घेतला जाईल. नागरिकांना दिलासा दिला जाईल, असेही नमूद केले होते.दरम्यान, अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागून येत असल्याने नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसतो. यातून मुक्तता झाल्यास दिलासा मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेमुळे शहरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या. घोषणेप्रमाणे पंधरा दिवसांत काही तरी निर्णय होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्तीकर माफीच्या कसल्याही हालचाली झाल्याच्या दिसून येत नाही.>‘काउंटडाउन’ आंदोलनानंतरही नाही कार्यवाहीचिंचवड येथील कार्यक्रमात ‘शास्तीची धास्ती १५ दिवसांत घालवू’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर विरोधकांनी शास्तीमाफीचा फलक पिंपरी-चिंचवड महापालिका भवनासमोर लावून ‘काउंटडाउन’ आंदोलन केले. विरोधी पक्षांनी १२ जानेवारीपासून ‘काउंटडाउन’ सुरू केले होते. ‘पिंपरी-चिंचवड शहरवासीयांनो, शास्तीकर माफ होतोय. दिवस राहिले —!’ असा फलकावर उल्लेख करण्यात आला.>मुख्यमंत्री आश्वासन : नागरिकांमध्ये नाराजीपिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासह शास्तीकर माफीबाबत यापूर्वीही मंत्र्यांसह इतरही राजकीय नेत्यांकडूनही अनेकदा घोषणा झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नसल्याने नागरिकांची निराशा झाली. दरम्यान, खुद्द मुख्यमंत्र्यांनी शास्तीमाफीची घोषणा केल्याने आता तरी हा प्रश्न मार्गी लागेल, अशी आशा शहरवासीयांना होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेस १५ दिवस उलटल्याने मुख्यमंत्र्यांची घोषणाही केवळ तात्पुरतीच होती काय, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.