शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:24 IST

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक शनिवारी मोरवाडी येथील आयुक्तांच्या बंगल्यावर झाली. त्यात शहरात तब्बल तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. शहरातील गुन्हेगारी कमी करण्याकरिता सहाशे ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.स्मार्ट सिटीच्या बैठकीस आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आयुक्त श्रावण हर्डीकर, संचालक सचिन चिखले, प्रमोद कुटे, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, सहायक कार्यकारी अधिकारी लक्ष्मण कोल्हे उपस्थित होते.पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी कमी कमी करण्यासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत सहाशे ठिकाणी ह्यसीसीटीव्हीह्ण कॅमेरेबसविण्यात येणार आहेत. त्याचे नियंत्रण पालिकेत असणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत व सुनियोजित होण्याकरिता सर्व चौकातील सिग्नल व्यवस्था अद्ययावत केली जाणार आहे. शहरात आॅप्टिकल फायबर नेटवर्कसाठी डक्ट टाकण्यात येणार आहेत, असे सत्तारुढ गटनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.साडेसातशे किलोमीटर भूमिगत वाहिनीएकनाथ पवार म्हणाले, पिंपळे गुरव, सौदागर आणि रावेत परिसरात साडेसातशे किलोमीटर भूमिगत वाहिनी टाकण्यात येणार आहे. तीनशे वायफाय स्पॉट आणि स्मार्ट किआॅस्क निर्माण करण्यात येणार आहेत. महापालिका व पोलीस यंत्रणा यांच्यासाठी कंट्रोल अ‍ॅण्ड कमांड सेंटर तयार करण्यात येणार आहे. आगामी वर्षभरात ही कामे केली जाणार आहेत. या कामाची निविदाप्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल.’’पॅन सिटीसाठी सल्लागारबैठकीत सुरुवातीला सभावृत्तांत कायम करण्यात आला. पॅन सिटी प्रकल्पासाठी सल्लागार संस्थेची नेमणूक, पीएमपीएमएलचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांची नियुक्ती, महापालिकेचे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांची मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नेमणूक, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीसाठी निविदाधारक संस्थेबरोबर कामकाजाचा करारनामा करून घेण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्यात आले.पदाधिकारी अनुपस्थितवर्षभरात स्मार्ट सिटीच्या कामास गती मिळालेली नाही. बैठका आणि प्रशासकीय कार्यवाही सुरू आहेत. कंपनीच्या सदस्यांची अनुपस्थितीही वाढू लागली आहे. पालिकेतील स्मार्ट सिटीच्या तिसºया बैठकीला अध्यक्ष डॉ. नितीन करीर अनुपस्थित होते. करीर यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधला. महापौर नितीन काळजे, पुणे पोलीस आयुक्त व संचालक रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलच्या अध्यक्षा नयना गुंडे, विरोधी पक्षनेते योगेश बहल हेही बैठकीस अनुपस्थित होते.

टॅग्स :cctvसीसीटीव्ही