लोणावळा : खंडाळा येथील अमृतांजन पुलावरून द्रुतगती महामार्गावरून पडून एका पर्यटकाचा रविवारी सायंकाळी दुर्दैवी अंत झाला. सायंकाळी ६:४५च्या सुमारास ही घटना घडली.जय अजयभाई कारिया (वय १९, रा. राजकोट, गुजरात) असे या मयत युवकाचे नाव आहे. जय हा त्याच्या आई-वडिलांच्या सोबत लोणावळ्यात पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी ६:४५ला ते सर्वजण खंडाळा परिसरातील अमृतांजन पूल परिसरात फिरत असताना अमृतांजनच्या एका पुलावरून दुसऱ्या पुलावर उडी मारण्याच्या नादात तोल गेल्याने सुमारे ५० फूट खोल द्रुतगती महामार्गावर पडून जय मृत झाला. या पुलावरून पडून अनेकांचा जीव गेला आहे. मात्र उपाययोजना केलेल्या नाहीत. (वार्ताहर)
पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू
By admin | Updated: May 11, 2015 06:15 IST