शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मुळशीत मारहाण झालेल्या कामगाराचा मृत्यू; शवविच्छेदन अहवालानंतर गुन्हा होणार दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:59 IST

जांबे (मुळशी) येथे सोमवारी (दि ६) रस्त्यावरून जात असताना सफाई कामगाराला किरकोळ कारणावरून चौघांनी हातांनी मारहाण केली होती, त्या तरुणाचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला.

ठळक मुद्देसोमवारी रात्री ८ च्या सुमारास तीन-चार इसमांनी त्याला लाथा बुक्क्यांनी केली होती मारहाण शवविच्छेदनाच्या अहवालानंतर दाखल करण्यात येईल गुन्हा

वाकड : जांबे (मुळशी) येथे सोमवारी (दि ६) रस्त्यावरून जात असताना सफाई कामगाराला किरकोळ कारणावरून चौघांनी हातांनी मारहाण केली होती, त्या तरुणाचा आज सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. मात्र हा आकस्मिक मृत्यू की खून हे अद्याप स्पष्ट नाही. अजय सहानी (वय ३५, रा. जांबे, मूळ उत्तर प्रदेश) असे त्या सफाई कामगाराचे नाव आहे. सोमवारी रात्री ८ च्या सुमारास त्याचे जांबे येथे भांडणे झाल्याने तीन-चार इसमांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर घरी येऊन अंग दुखत असल्याने तो पुनावळे येथे रुग्णालयात उपचार घेऊन आला. औषधेही घेतली सकाळी पुन्हा त्रास होत असल्याने तो डॉक्टरांकडे गेला असता त्याला तिथे फिट आल्याने डॉक्टरांनी त्याला वाकड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हिंजवडी पोलिसांनी भांडणे झालेल्या दोघा इसमांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होऊन त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे हिंजवडीचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे यांनी सांगितले.

टॅग्स :hinjawadiहिंजवडीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड