शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

नयना पुजारी हत्येप्रकरणी तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा

By admin | Updated: May 9, 2017 17:42 IST

पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 9 : पुण्याला हादरवणाऱ्या संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी हिच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पुणे सत्र न्यायालयातील न्यायाधीश श्रीमती एल. एल. येनकर यांनी आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम या तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.

भारतीय दंडविधानाच्या १२० (कट रचणे) ३६६ (अपहरण) ३७६ ग (सामूहिक बलात्कार) ३०२ (खून), जबरी चोरी (३९७) मृताच्या शरीरावर असलेला ऐवज चोरणे (४०४)  अशा सहा कलमांखाली आरोपींना दोषी ठरवले आहे. माफीचा साक्षीदार राजेश चौधरीची सुटका करण्यात आली.  शिक्षेची सुनावणी सकाळी 11 वाजता होणार होती. मात्र पोलिसांनी तासभर आधीच आरोपींना कोर्टात हजर केले, आरोपी योगेश राऊत, महेश ठाकूर आणि विश्वास कदम यांना शिक्षा सुनावण्यापूर्वी न्यायालयाने या तिघांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली. 

यावेळी आरोपी योगेशने आपल्याला या गुन्ह्यात गोवण्यात आलं आहे. मी गुन्हा केलेला नाही. गुन्ह्यात वापरलेली गाडी त्या दिवशी माझ्याकडे नव्हती. मला एक मुलगी, पत्नी आणि आई आहे. शिक्षा देताना त्याचा विचार व्हावा असा युक्तीवाद मांडला. माफीचा साक्षीदार झालेला राजेश चौधरीही गुन्ह्यात सहभागी होता. आम्हाला जर शिक्षा द्यायची असेल तर त्यालाही द्या अशी मागणी योगेश राऊत आणि विश्वास कदम यांनी केली. महेश ठाकूरलाही न्यायाधीशांनी पुढे बोलावून शिक्षेबाबत विचारलं, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला.

काय आहे प्रकरण - नयना पुजारी कामावरून घरी जात असताना रात्री खराडी बायपास येथे उभ्या होत्या. इंडिका कॅब चालक योगेश राऊत याने नयना यांना घरी सोडण्याच्या बहाण्याने मोटारीतून निर्जन भागातून घेऊन गेला. ३ मित्रांसह त्यांच्यावर तीनदा बलात्कार केला. नंतर खून करुन ओळख पटू नये म्हणून दगडाने चेहरा ठेचला. हा गुन्हा येरवडा पोलीस ठाण्यात ८ऑक्टोबर 2009 रोजी दाखल झाला.

या गुन्ह्यातील मास्टर मार्इंड समजला जशरारा योगेश राऊत हा  ससून रुग्णालयाच्या त्वचारोग विभागात दाखल असताना नैसर्गिक विधीच्या बहाण्याने  १७ सप्टेंबर २०११ रोजी फरार झाला होता.  गुजरातमधील वापी, बडोदा, पोरबंदर, सोमनाथ, द्वारका, अहमदाबाद, राजस्थानमधील अजमेर, चितोडगड, जयपूर अशा ठिकाणी विशेष तपास पथकाने राऊत याचा अथक शोध घेतला. पोलीसांना राऊत पंजाब, दिल्ली येथे असल्याची माहिती समजली. या माहितीचा पाठपुरावा करण्यासाठी तपास पथक मे महिन्यात दिल्लीमध्ये दाखल झाले. चिकाटीने तपास पथक काम करत असताना राऊत हा दिल्लीहून शिर्डीला रवाना झाल्याची माहिती समजली. या तपास पथकाने तात्काळ शिर्डी गाठली. ज्या ठिकाणी राऊत येणार होता़  तेथे सापळा रचला. शिर्डी बस ठाण्यात राऊतला पकडण्यात आले होते. या खटल्याचा निकाल लागण्यास ७ वर्षांचा कालावधी लागला. सरकार पक्षाकडून ३७ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी सरकार पक्षाकडून बाजू मांडली. न्यायालयाने आज दोन्ही बाजुकडील युक्तिवाद ऐकून घेऊन तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.