शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

दिवसाआड पाणी कपात लांबणीवर

By admin | Updated: April 12, 2016 04:27 IST

विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत

पिंपरी : विविध विकासकामांच्या उद्घाटन प्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ एप्रिलपासून पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसाआड पाणीपुरवठ्याची घोषणा केली होती. मात्र, याबाबत महापालिका, जलसिंचन, पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक न झाल्याने तूर्ततरी हा कपात लांबणीवर पडली आहे.यंदा पाऊस कमी झाल्याने मावळातील पवना धरणातील साठा कमी झाला आहे. त्यामुळे शहरात दिवसातून एकवेळ पाणीपुरवठ्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले होते. ही कपात ११ डिसेंबरपासून लागू करण्यात आली होती. या वेळी दहा टक्के पाणीकपात केली. त्यानंतर ११ मार्चला त्यात पाच टक्के वाढ करून पंधरा टक्के पाणी कपात केली आहे. दिवसाला बाराशे क्युसेक पाणी धरणातून सोडण्यात येत आहे. सध्या धरणात ३३ टक्के साठा असून, गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा १५ टक्क्यांनी कमी आहे. पाणी साठा कमी झाल्याने पाटबंधारे विभागाने मे महिन्यात शेतीपंपाचेही पाणी बंद करणार असल्याचे सूचित केले आहे. पुण्यात यापूर्वीच दिवसाआड पाणीपुरवठ्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पवार यांनी एका कार्यक्रमात सूतोवाच केले होते. त्यामुळे एकवेळ पाणीपुरवठ्यातच कपात करणार की, दिवसाआड पाणी पुरवठा करणार, याबाबत पाणीपुरवठा विभागाने ही पाणीकपात कधीपासून लागू होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)पाणीकपातीविषयी चर्चा करण्यासाठी पुढील आठवड्यात महापालिका अधिकारी, जलसिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येईल. किती प्रमाणात पाणीकपात करायची यावर चर्चा होईल, त्यानंतर महापालिकेतील विविध पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा केली जाईल. त्यानंतर पाणीकपातीचा निर्णय जाहीर करण्यात येईल, असे आयुक्त राजीव जाधव म्हणाले.