शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दापोडी-पिंपरी मार्गावर होणार डिसेंबरअखेर मेट्रोची ट्रायल रन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 02:59 IST

महामेट्रोची माहिती : महापालिकेच्या हद्दीतील ५३ टक्के काम पूर्ण

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरी ते दापोडी मेट्रो मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ५३ टक्के काम पूर्ण झाले असून, डिसेंबरअखेर पिंपरी महापालिकेच्या हद्दीत मेट्रोची ट्रायल रन करण्याची तयारी सुरू आहे.

महामेट्रोकडून पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी मार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. साधारण १६.५ किलोमीटरपैकी पिंपरी ते रेंजहिल हा मार्ग एलेव्हेटेड आहे. त्यानंतर स्वारगेटपर्यंत हा मार्ग भुयारी असणार आहे. रेंजहिल परिसरात भुयारी मेट्रोचे काम सुरू आहे. साधारण दोन वर्षे या कामासाठी लागणार असल्याचा महामेट्रो प्रशासनाचा दावा आहे. दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुकीपूर्वी पिंपरी महापालिकेच्या हद्दीतील सुमारे साडेसहा किलोमीटरच्या हद्दीतील मेट्रो मार्गाचे काम पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.

खराळवाडी ते एचएपर्यंतची वाहतूक खुलीपिंपरी महापालिका हद्दीत मेट्रोचे काम सुरू असल्याने जुन्या महामार्गावरील मध्यवर्ती लेनच्या बाजूला सुरक्षेसाठी पत्र्याचे फलक उभारण्यात आले आहेत. खराळवाडी ते एचए कंपनीच्या बस थांब्यापर्यंत मेट्रो उभारणीचा टप्पा पूर्णझाला आहे. त्यामुळे या भागातील सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले फलक हटवून हा संपूर्ण टप्पा वाहतुकीसाठी खुला केला आहे. या ठिकाणी दोन पिलरवर रंगरंगोटी करण्यात आली आहे, अशी माहिती बिºहाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पिंपरी महापालिका हद्दीत भूसंपादनाचा अडथळा नसल्याने मेट्रोसाठी फाउंडेशन, पिलर, कॅप व स्पॅन उभारण्याचे काम गतीने सुरू आहे. आतापर्यंत मेट्रोच्या खांबाचे २८१ फाउंडेशन, २१३ खांबांची उभारणी, १४१ खांबांवरील कॅप व ८९ व्हायाडक्ट स्पॅनचे काम पूर्ण झाले आहे. संत तुकारामनगर व फुगेवाडी येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरू झाले आहे. काही प्रमाणात नाशिक फाटा येथे आव्हानात्मक काम करावे लागत आहे. मेट्रोच्या कामाच्या प्रगतीबरोबर वाहतूककोंडी सोडविण्यासाठी टप्प्याटप्प्याने महामार्ग खुला करण्यात येत आहे.- गौतम बिऱ्हाडे, कार्यकारी संचालक, महामेट्रो