शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थांची धोकादायक हाताळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 04:18 IST

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड : आरोग्य विभागाकडून तपासणी; स्वच्छतेची काळजी न घेतल्याने बजावली नोटीस

खडकी : दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खडकी बाजारातील मिठाईची दुकाने, हॉटेल आणि बेकरी यांची खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने तपासणी करण्यात आली. यात काही व्यावसायिकांनी स्वच्छतेची काळजी न घेतल्याचे आढळून आले. त्यामुळे अशा व्यावसायिकांना बोर्डाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाच्या वतीने अन्नपदार्थ विक्रीच्या ठिकाणांची पाहणी करण्यात येत आहे. अन्न योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यात येत आहे. खडकीतील हॉटेल, बेकरी आणि मिठाईच्या दुकानांची तपासणी करण्यात येत आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि स्टेशन हेल्थ आॅर्गनायझेशन यांच्या वतीने खडकी व आसपासच्या परिसरातील खाद्यपदार्थ, मिष्ठान्न विक्री करणारी दुकाने, हॉटेल, बेकऱ्या आदी ठिकाणी जाऊन आरोग्य विभागामार्फत पाहणी केली जात आहे. बुधवारी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये खडकीतील बेंगलोर बेकरी येथे जमिनीवर, उघड्यावर खाद्यपदार्थ ठेवल्यामुळे व मेहता टॉवर आकाशदीप सोसायटी येथील काही सदनिकाधारकांना गॅलरीमध्ये झाडांच्या कुंड्या लावल्यामुळेही नोटीस बजाविण्यात आल्या.

स्टेशन हेल्थ आॅर्गनायझेशनच्या लेफ्टनंट कर्नल सुखमीत मिनाझ, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य अधीक्षक बी. एस. नाईक, आरोग्य निरीक्षक शिरीष पत्की आणि कर्मचाºयांचा या मोहिमेत सहभाग होता. यांच्या पथकाने ही कारवाई केली.

एकाच दिवसात दहा व्यावसायिकांना नोटीस४ योग्य पध्दतीने हाताळणी न करता खाद्यपदार्थ जमीनीवर ठेवल्याचे आढळल्याने बँगलोर बेकरीसह सात दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली. दुकानात कचरा व घाण आढल्यलाामुळे तीन दुकानदारांनाही नोटीस देण्यात आल्या. खाद्यपदार्थांची हाताळणी योग्य पध्दतीने करण्यात यावी, त्यात सुधारणा होणे आवश्यक आहे. पुन्हा होणाऱ्या तपासणीत असाच प्रकार आढळून आल्यास कारवाई करण्यात येईल, अशी सूचना या नोटीसीतून देण्यात आली आहे.

गॅलरीतील कुंड्या काढण्याच्या सूचना४घराच्या गॅलरीमध्ये कुंड्या ठेवल्याचेही या पाहणीदरम्यान अधकिºयांच्या निदर्शनास आले. या कुंड्यांतील पाणी आणि माती तेथून ये-जा करणाºया नागरिकांच्या अंगावर पडत असल्याचे या वेळी दिसून आले. त्यामुळे या कुंड्या काढून घेण्यात याव्यात, अशी सूचना करीत आठ सदानिकाधारकांनाही या वेळी नोटीस देण्यात आल्या.ग्राहकांनी सजग राहण्याची गरज४खाद्यपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी सजग राहावे. खाण्यायोग्यच खाद्यपदार्थ खरेदी करावेत. खाद्यपदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा काय कसे, याबाबत पडताळणी करावी. त्याबाबत काही शंका असल्यास तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा किंवा बोर्डाच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही या वेळी करण्यात आले.

स्वच्छता पाळण्याचे आवाहन४ खाद्यपदार्थ विके्रत्यांनीही भेसळ करू नये. जेणेकरून ग्राहकांच्या आरोग्यास बाधा होणार नाही. खाद्यपदार्थनिर्मिती आणि विक्रीच्या ठिकाणी स्वच्छता पाळावी. खाद्यपदार्थांची हाताळणीही योग्य प्रकारे करावी. मुदतबाह्य खाद्यपदार्थांचीही योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी, असे आवाहन आरोग्य विभागाच्या अधिकाºयांनी केले आहे.

टॅग्स :Khadkiखडकीfood poisoningअन्नातून विषबाधा