शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाआड पाणीपुरवठा मंगळवारपासून

By admin | Updated: May 1, 2017 02:56 IST

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. आज रोजी पवना

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शहरात दैनंदिन पाणीपुरवठा केला जातो. आज रोजी पवना धरणात ३७ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच दिवशी २६ टक्के पाणीसाठा होता. महाराष्ट्र दिनानंतर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.यंदाचा पाऊस सरासरीइतका होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला असला; तरी वाढलेली लोकसंख्या व वाढलेला पाणी उपसा लक्षात घेऊन, प्रत्यक्ष पावसाळा होऊन धरणात पुरेसा पाणीसाठा होईपर्यंत उपलब्ध पाणीसाठा जपून वापरणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर पाणीकपात आवश्यक आहे. तसेच बचतीसाठी व अपव्यय टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महापौर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच सर्व पदाधिकारी, गटनेते व अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. बैठकीनुसार २ मेपासून पाणीपुरवठ्यामध्ये २५ टक्के कपात करण्यात येत आहे. पर्यायाने शहरास दिवसाआड एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पाऊस लांबल्यास आढावा बैठक घेऊन कपातीमध्ये वाढ करण्यात येणार आहे. पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिन्यांमधील गळती शोधण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये भरारी पथक नेमण्यात येत आहे. तसेच पाण्याचा गैरवापर, अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर प्रसंगी नळजोड खंडित करण्याची कारवाई भरारी पथकामार्फत करण्यात येणार आहे. अपवादात्मक परिस्थितीवगळता टॅँकरने पाणीपुरवठा बंद राहील. धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर व धरणातील पाणीसाठा पुरेसा वाढल्यानंतर दैनंदिन एकवेळ पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)नितीन काळजे : पाण्याचा अपव्यय टाळाउपरोक्त निर्णयाच्या अनुषंगाने ज्या भागांना २ मे २०१७ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे व ज्या भागांना ३ मे २०१७ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या तारखांनंतर त्या त्या भागांना एक दिवस सोडून म्हणजेच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल. ‘‘सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, महानगरपालिकेमार्फत वितरित होणारे पाणी जपून वापरावे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.