शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्याने दाखविलेल्या निष्काळजीपणामुळे सिलेंडरचा स्फोट ; महिला जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 14:24 IST

मोशी येथे खोलीत एकट्याच राहणाऱ्या भारत गॅस एजन्सीच्या पांजरपोळ येथील वैष्णवी एजन्सीतून त्यांनी रेग्युलेटर आणि गॅस सिलेंडर घेतला.

ठळक मुद्देगॅस वितरण एजन्सीच्या कामगाराविरूद्ध गुन्हा दाखल 

पिंपरी : आळंदी रस्ता मोशी येथे राहणाऱ्या महिलेने सिलेंडरच्या गळतीबाबत तक्रार नोंदवूनही गॅस एजन्सीचा कर्मचारी वेळेत न पोहचल्यामुळे गॅस सिलेंडरचास्फोट झाल्याची घटना घडली. त्यात महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. २३ फेब्रु.) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी गॅस वितरकाच्या कर्मचाऱ्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश भागुजी हिंगणे (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे. वैष्णवी गॅस एजन्सीत काम करणाऱ्या नितीन नागरगोजे (वय २८) या कामगाराविरूद्ध भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांची बहीण रंजना या स्स्ते इमारतीतील खोलीत एकट्याच राहतात. वैष्णवी एजन्सीतून त्यांनी रेग्यलेटर आणि गॅस सिलेंडर घेतला. १६ फेब्रुवारी२०१९ रोजी त्यांनी रेग्युलेटरमध्ये बिघाड असल्याने गॅस गळती होत असल्याचे एजन्सीला कळविले. नागरगोजे यांच्याशी संपर्क साधल्यास ते दुरूस्त करून देतील असे एजन्सीतून सांगण्यात आले. मात्र नागरगोजे यांनी तक्रारदार ग्राहकाच्या घरी जाऊन गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटरची प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक होते. या बद्दल गांभीर्याने दखल न घेता, एजन्सीच्या कार्यालयात बसूनच ते फिर्यादीच्या बहिणीस गॅस सुरू करण्याबाबत सूचना देत होते. गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटरमधील बिघाड दुरूस्त न करता, ते एजन्सीतून सूचना देवू लागले. ते मोबाईलवरून देत असलेल्या सुचनांचे पालन करत रंजना यांनी रेग्युलेटर सुरू केला. रेग्युलेटर सुरू करताच, गॅस गळतीने घरात स्फोट झाला. रंजना स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी गॅस एजन्सीच्या कामगारावर निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :moshiमोशीCylinderगॅस सिलेंडरBlastस्फोटWomenमहिला