शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

सायकल शेअरिंग लांबणीवर, करारनाम्याअभावी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2018 01:10 IST

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे.

पिंपरी - केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटीअंतर्गत उद्योगनगरीत सायकल शेअरिंग योजना राबविण्याचे जाहीर केले होते. यासाठी स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त काढला होता. मात्र, सायकली पुरविणाऱ्या संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने हा मुहूर्त हुकणार आहे.शहराचा केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत समावेश झाल्यानंतर या योजनेतील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सायकल शेअरिंग ही योजना राबविण्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जाहीर केले होते.स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात पिंपळे सौदागर व परिसर निवडला होता. या योजनेकरिता नाममात्र दरांत सायकली उपलब्ध करून देण्याची युलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे. याकरिता प्रतितास नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, हे भाडे आॅनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. दरम्यान, नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागरमधील बीआरटीएस मार्गालगत महापालिका प्रशासनाने सायकल उभ्या करण्यासाठी केवळ जागा उपलब्ध करून देणार आहेत. याशिवाय सोसायट्यांच्या आवारात सायकलीसाठी जागा मिळणार आहे.शहरात ४५ ठिकाणी नियोजनपिंपळे सौदागर व परिसरात एकूण ४५ ठिकाणी या सायकली उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. सुरुवातीला सायकलींची संख्या दोनशे होती; मात्र त्यामध्ये वाढ करून ही संख्या पाचशेपर्यंत वाढविण्यात आली आहे. एका ठिकाणी किमान पाच सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सायकली पुरविणाºया संस्थेशी करारनामाच होऊ न शकल्याने स्वातंत्र्य दिनाचा मुहूर्त हुकणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडnewsबातम्या