शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळा वाढल्याने आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 02:40 IST

फॅमिली पॅकला दिली जाते जादा पसंती

चिंचवड : उन्हाच्या झळांनी शहरातील वातावरण तापू लागले आहे. यामुळे शहरातील विविध दुकानांमध्ये व आइस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी वाढत आहे. विविध प्रकारच्या थंडगार आइस्क्रीम, मस्तानी, कुल्फी, मिल्कशेक, सरबत, ज्यूस व फालुदा या थंडगार पदार्थांची मागणी वाढली आहे.वाढत्या गरमीतून बचाव करण्यासाठी नागरिक आइस्क्रीमचा आनंद घेण्यासाठी पार्लरमध्ये जात असल्याचे दिसत आहे. सध्या बाजारातील आइस्क्रीम पार्लरमध्ये विविध प्रकारच्या आइस्क्रीम आल्या आहेत. कॉनेटो, कँडी, चोकोबार, कसाटा, कुल्फी यांना सर्वाधिक मागणी आहे. याचबरोबर विविध प्रकारचे फॅमिली पॅक, कप यांनाही ग्राहक पसंती देत आहेत. पिस्ता, मँगो, बटरस्कॉच, चॉकलेट, केशर, ब्लॅककरंट, राजभोग, व्हॅनिला, रोझ अशा विविध प्रकारचे फ्लेवर ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत. याचबरोबर ड्रायफ्रूटच्या आइस्क्रीम ही उपलब्ध आहेत.फळांपासून बनविण्यात येणाऱ्या ज्यूस व आइस्क्रीमला विशेष मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यामध्ये स्ट्रॉबेरी, पेरू, अंजिर, संत्रा-मंत्रा, सीताफळ, चिकू, रासबेरी, मँगो, नारळ या फळांपासून तयार होणारे आइस्क्रीम उपलब्ध आहेत. याचबरोबर मस्तानी या प्रकाराची क्रेझ वाढत आहे. दूध, सिरप, आइस्क्रीम, ड्रायफ्रूट यांच्या मिश्रणातून तयार होणाऱ्या मस्तानीला ग्राहक पसंती देत आहेत. आइस्क्रीम दहा रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत असून कुल्फी दहा ते चाळीस व मस्तानी साठ ते दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. सध्या वाढत असणाºया उन्हामुळे ग्राहकांची पावले आइस्क्रीम पार्लरकडे वळत आहेत. दुपारच्या वेळी शुकशुकाट असणाºया आईस्क्रीम पार्लरमध्ये गर्दी दिसत आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी चांगले दिवस आले आहेत.रोल आइस्क्रीमची क्रेझग्राहकांच्या मागणीनुसार त्वरित आइस्क्रीम बनवून देण्याचा प्रकार आता बाजारात दाखल झाला आहे. मशिनवर विशिष्ट तापमान सेट करून टेबलावर बर्फासारखा भाग तयार केला जातो. अथवा भांडे थंड केले जाते. यामध्ये हवे असणारे फ्लेवर एकत्र करून आइस्क्रीम तयार केले जाते. ग्राहकांच्या समोर याचे रोल तयार करून दिले जातात. समोर उभे राहून आपली मनपसंद आइस्क्रीम बनून घेत आहेत. आइस्क्रीम बनविताना पहावयास मिळत असल्याने या प्रकारच्या आइस्क्रीमची क्रेझ असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड