शहरं
Join us  
Trending Stories
1
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
2
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
3
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
4
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
5
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
6
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
7
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
8
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
9
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
10
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
11
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
12
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
13
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
14
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
15
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
16
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
17
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
18
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
19
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
20
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 

अनधिकृत फ्लेक्स उभारणा-यांवर फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:21 AM

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने फ्लेक्स व जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. विना परवाना व अनधिकृत फ्लेक्स उभारणाºयांवर आता फौजदारी कारवाई केली जाणार आहे, असा इशारा आकाशचिन्ह परवाना विभागाने दिला आहे.महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महाराष्ट्र महापालिका अधिनियम २४४ व २४५ तसेच महाराष्ट्र महापालिका जाहिरात नियमावली २००३ चे नियमानुसार आकाश चिन्ह उभा करणे पूर्वी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता असते. स्थायी समिती सभेत अनधिकृत फ्लेक्सचा मुद्दा गाजला होता. त्या वेळी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी संबंधित विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले होते. शहरातील अनधिकृत आणि अनधिकृत फ्लेक्स किती याची माहिती विचारली होती. तसेच या विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी कोणत्या प्रकारचे प्रयत्न केले जाऊ शकतात. याविषयी संबंधित विभागाला सूचना केल्या होत्या. तसेच महापालिकेचे उत्पन्न बुडविणाºयांवर कारवाई करावी, असेही निर्देश दिले होते. त्यानंतर आकाशचिन्ह परवाना विभागास जाग आली आहे.महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये जाहिरात फलक, होर्डिंग, किआॅक्स व इत्यादी लावायचा असेल तर अर्ज नागरी सुविधा केंद्रा मार्फत करणे आवश्यक आहे. अर्ज, स्थळ दर्शक नकाशा, जागा मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र, इमारत, जागेचे मालकी हक्काबाबत पुरावा, संरचना अभियंता यांचेकडील स्ट्रक्चर स्टॅबिलीटी प्रमाणपत्र, वृक्ष संवर्धन विभागाकडील ना हरकत प्रमाणपत्र, जाहिरातदाराचे हमी पत्र, जाहिरात फलक इमारतीवर लावणार असलेस इमारत पूर्णत्वाचा दाखला जोडणे आवश्यक आहे.