शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांच्या चौकशीचे आदेश; बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी घेतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 03:24 IST

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली.

पिंपरी : अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सर्वसाधारण सभेत केला. त्यांनी संभाषणासाठी क्लिपही सादर केली. अनधिकृत बांधकाम सुरू असेल, तर बीट निरीक्षक बांधकाम मालकाला पालिकेत बोलवतात. पैसे घेऊन कारवाई टाळतात. बांधकाम विभागातील सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली.महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर कलाटे यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवड शहरावर अनधिकृत बांधकामाची टांगती तलवार आहे. तरीही राजरोसपणे शहरात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बांधकाम परवाना विभागातील अधिकाºयांच्या कृपाशीर्वादाने ती सुरू आहेत. एखादे अनधिकृत बांधकाम शहरात सुरू असेल, तर बीट निरीक्षक तिथे जाऊन पैशाची मागणी करतो. पालिकेत बोलवून घेतो. बांधकाम मालकाकडून पैसे घेऊन ती कारवाई टाळली जाते. सर्रासपणे असा प्रकार महापालिका मुख्यालयात सुरू आहे. बांधकाम परवानगी विभागातील सर्वच अधिकाºयांना निलंबित करा. नगररचना विभागातही तसाच गलथान कारभार सुरू आहे. नगरसेवक गेले की फायली लपविल्या जातात. अधिकारी पैसे खातात, बदनाम मात्र नगरसेवक होतात. सर्वांचीच सखोल चौकशी व्हावी.’’मंगला कदम म्हणाल्या की, महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी धक्कादायक घटना पुराव्यासह राहुल कलाटे यांनी समोर आणली आहे. आयुक्तांचा या प्रकारावर वॉच असला पाहिजे.महापौर नितीन काळजे यांनी शेवटी या प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला. काळजे म्हणाले की, बीट निरीक्षक पैसे घेऊन अनधिकृत बांधकामांना अभय देत असतील, तर ती अत्यंत चुकीची बाब आहे. आयुक्तांनी या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.महापौर काळजे म्हणाले, की हा सभेचा विषय नाही. सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘‘अधिकारी पैसे घेत असतील, तर नक्कीच त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाजपा पारदर्शक कारभार करीत आहे. अशा प्रकाराला नक्कीच पाठिशी घालणार नाही.’’ त्यावर कलाटे यांनी संभाषणांची क्लिप सादर करण्याची परवानगी मागितली. मात्र, महापौरांनी ती नाकारली. त्यानंतर कारवाई आणि चौकशीची मागणी कलाटे यांनी केली. त्यानंतर महापौरांनी चौकशीचा आदेश दिला.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड