शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करणाऱ्या बिल्डरला सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 02:10 IST

भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

पुणे - भंगार वेचणा-या चार मुलींना कोंडून ठेवत त्यातील चौदा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणा-या बांधकाम व्यावसायिकाला न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला.आयुब कासीम पटेल (वय ४४, रा. म्हाडा कॉलनी, तळेगाव स्टेशन, ता. मावळ) असे शिक्षा देण्यात आलेल्या बिल्डरचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीला दत्तक घेतलेल्या भावाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. २२ जून २०१२ रोजी वराळेत सुरू असलेल्या एका नवीन इमारतीत हा प्रकार घडला. खटल्यात अतिरिक्त सरकारी वकील उज्ज्वला रासकर यांनी एकूण २६ साक्षीदार तपासले. आरोपी पटेल हा बांधकाम व्यावसायिक आहे. तर पीडित मुलगी ही अनाथ असून तिला एका कुटुंबाने दत्तक घेतले आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या १७, १९, आणि १८ वर्षीय मैत्रिणींबरोबर भंगार गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपीने चौघींना जबरदस्तीने इमारतीतील पंपींग स्टेशन येथे डांबून ठेवले. आरोपीने पीडित मुलीला चौथ्या मजल्यावर नेऊन तोंडात बोळा कोंबून तिच्यावर बलात्कार केला.साक्षीदार फितूर होऊनही पटेलला शिक्षापीडित मुलीच्या मैत्रिणी खटल्यात फितूर झाल्या होत्या. मात्र पीडित मुलीची साक्ष, वैद्यकीय पुरावे महत्त्वाचे मानत न्यायालयाने आरोपीला दहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. बांधकाम साईटवरील साहित्य चोरल्यानंतर स्वत:ला वाचविण्यासाठी मुलीने हा खोटा गुन्हा दाखल केला आहे, असा बचाव पटेल यांच्या वकिलाने केला होता.

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालय