शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शहरालगतचे फार्महाऊस होताहेत गुन्हेगारीचे केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 02:40 IST

- संजय माने पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेली फार्महाऊस गुंडांची आश्रयस्थाने आणि गुन्हेगारीची केंद्रे बनू ...

- संजय माने

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरापासून थोड्या दूर अंतरावर असलेली फार्महाऊस गुंडांची आश्रयस्थाने आणि गुन्हेगारीची केंद्रे बनू पाहत आहेत. त्याचा प्रत्यय नुकताच एका घटनेतून आला आहे.

खेड तालुक्यातील चांदूस कोरेगाव येथील एका फार्महाऊसमध्ये विक्रीसाठी आणलेल्या पिस्तूल आणि काडतुसांचा साठा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी फार्महाऊसवरून तब्बल ७ पिस्तूल आणि २१ काडतुसे जप्त केली.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने आरोपी योगेश बाजीराव दौंडकर (वय ३५, रा. शेलपिंपळगाव) यास मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी मोशीजवळ गावठी बनावटीचा पिस्तूल तसेच जिवंत काडतुसे आणि दुचाकी यासह त्याला अटक केली होती. पोलिसांनी त्याचे रिमांड घेऊन अधिक चौकशी केली असता, खेड तालुक्यातील चांदूस कोरेगाव या ठिकाणी आणखी पिस्तूल ठेवले असल्याची माहिती त्याने दिली.

तपास पथकाने फार्महाऊस येथे जाऊन आरोपीने लपवून ठेवलेले ७ देशी बनावटीचे पिस्तूल आणि २१ जिवंत काडतुसे हस्तगत केली. या घटनेमुळे गाव, खेड्याच्या ठिकाणचे शहरातील बड्या मंडळींचे फार्महाऊस अवैध कामासाठी उपयोगात आणले जात असल्याबद्दलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या निमित्ताने निर्जन ठिकाणच्या फार्महाऊसवर नेमके काय चालते? याचा शोध घेण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.चाकण परिसरात वाढले फार्महाऊसचाकणला आंतरराष्टÑीय विमानतळ होणार असल्याची घोषणा झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड, पुणे, चाकण, तळेगाव येथील अनेकांनी पाईट,चांदूस कोरेगाव, किवळे या भागात जमिनी खरेदी केल्या. मोठ्या प्रमाणावर जमिनीत गुंतवणूक केल्यानंतर काहींनी त्या पट्ट्यात फार्महाऊस बांधली. भामा नदीच्या अलीकडे तसेच पलीकडे निर्जन भागात अशी फार्महाऊस उभारण्यात आली आहेत.निर्जन ठिकाणांचा गुन्हेगारीसाठी वापरआंबीवरून तळेगाव एमआयडीसी, फेज दोन आणि चाकण येथे जाण्यास मार्ग असल्याने या भागात शहरातील बड्या मंडळींनी मोठ्या प्रमाणावर जागा घेतल्या आहेत. चाकणऐवजी पुरंदर येथील जागा विमानतळासाठी निश्चित झाली. चाकण येथील विमानतळाचा प्रस्ताव बारगळला, मात्र विमानतळासाठी शासनाने ज्या जमिनींचे भूसंपादन केले होते, त्या जमिनी एमआयडीसी फेज पाच करिता वापरात आणल्या जाणार आहेत.या भागात एमआयडीसीचा विस्तार होणार असल्याने जमिनीला भविष्यातही मोठी किंमत येणार आहे. हे लक्षात घेऊन या भागात जमिनी खरेदी केलेल्या काहींनी आपली फार्महाऊस उभारली आहेत. सर्वच फार्महाऊसमध्ये गैरप्रकार घडत नसले तरी काही फार्महाऊसचा गुन्हेगारी कारवायांसाठी उपयोग होत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. गोनवाडी, बोरदरा, रोहकल या भागातही जमिनी खरेदी करून फार्महाऊस बांधण्यास प्राधान्य दिले जात आहे. केवळ चाकणच नव्हे तर, तळेगाव परिसरात नव्हे तर मुळशी, तळेगाव, लोणावळा व मावळ परिसरात खेडोपाड्यात निर्जन स्थळी फार्महाऊस साकारली असल्याचे दिसून येते.