शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

पिंपळे सौदागर येथे बिल्डर वाधवानीविरूद्ध सात कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 15:08 IST

फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे.

ठळक मुद्देनरेश वाधवानी, जनाबाई काटे, सुरेश काटे, राजू काटे, संतोष काटे, वैशाली काटे अशी आरोपींची नावे६ कोटी ९२ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील जमिनीची खरेदी व विकसन हक्क करार फिर्यादी व त्यांच्या भागीदार कन्हैयालाल होतचंद मतानी यांना प्राप्त झाला होता. अशा परिस्थितीत, कायदेशीर बाबींची पूर्तता न करता प्रमुख आरोपी बांधकाम व्यवसायिक नरेश वाधवानी यांनी या जमिनीचे खरेदी व विकसनाचे हक्क स्वत: कडे घेतले. फिर्यादी खेमचंद भोजवानी व त्यांच्या भागीदाराची ६ कोटी ९२ लाख रूपयाची आर्थिक फसवणूक केली. या आरोपाची फिर्याद भोजवानी यांनी सांगवी पोलिसांकडे केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश ठाकुरदास वाधवानी यांच्यासह जनाबाई जयंवत काटे, सुरेश जयवंत काटे, राजू जयवंत काटे, संतोष जयवंत काटे, वैशाली चंद्रकांत काटे अशी आरोपींची नावे आहेत. संबंधित जमिनीचे विकसनाचे हक्क एम बी डेव्हलपर्सतर्फे फिर्यादी तसेच त्यांचे भागीदार कन्हैयालाल मतानी यांना आॅक्टोबर २०१० मध्ये मिळाले आहेत. सर्व्हे क्रमांक ४० मधील ३६.३८८० गुंठे जमिनीचे ओम डेव्हलपर्स यांच्याकडून विकसन आणि खरेदीचे हक्क त्यांनी प्राप्त केले. मात्र मंगलमूर्ती डेव्हलपर्सतर्फे बिल्डर नरेश वाधवानी यांनी जमिनीचे मूळ मालक काटे व त्यांच्या वारसांबरोबर संगनमत करून हवेली दुय्यम निबंधक कार्यालय येथे सर्च टायटल रिपोर्ट न घेता, स्वत: च्या नावे जमिनीची दस्तनोंदणी केली. त्यामुळे ६ कोटी ९२ लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याची फिर्याद भोजवानी यांनी दिली आहे.

टॅग्स :pimpale saudagarपिंपळे सौदागरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड