शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थेतील ठेवींनाही मिळणार विमा संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 07:37 IST

पतसंस्था फेडरेशनचे मॉडेल : पाच लाखापर्यंत संरक्षण. पतसंस्थांना बँकेचा दर्जा नसल्याने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे (डीआयसीजीसी) संरक्षण मिळत नाही.

विशाल शिर्केलोकमत न्यूज नेटवर्क  पिंपरी : पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. स्थैर्य निधी योजने अंतर्गत पतसंस्थांमधील ठेवींना पन्नास हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत संरक्षण मिळेल असा दावा करण्यात आला आहे. 

पतसंस्थांना बँकेचा दर्जा नसल्याने डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनचे (डीआयसीजीसी) संरक्षण मिळत नाही. पतसंस्था या ग्रामीण आणि छोट्या गुंतवणूकदारांना पत पुरवठा करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर फेडरेशनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांसमोर स्थैर्य योजनेचे सादरीकरण केले. सतीश मराठे, उदय जोशी, राधेश्याम चांडक यावेळी उपस्थित होते.

राज्यातील पतसंस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी सहकारी तत्वावर रोखता आधारित स्थैर्य निधी (लिक्विडिटी बेस प्रोटेक्शन फंड) स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार  पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळणार आहे.स्थैर्य योजनेत कसे सहभागी होता येणारn तरल रोखतेच्या १ टक्के रक्कम भरुन पतसंस्थांना सभासदत्व घ्यावे लागेलn योजनेत सहभागी पतसंस्था निधीची सहकार खात्याने परवानगी दिलेल्या बँकेत गुंतवणूक करावी लागेल- गुंतवणूक केलेली बँक, पतसंस्था व स्थैर्यनिधी यांच्यात करार केला जाणारn लेखापरीक्षणाच्या आधारे संबंधित पतसंस्थेच्या किती रकमेला संरक्षण देणार याचा अहवाल स्थैर्य निधीला द्यावा लागणारn स्थैर्य निधीच्या परवानगी शिवाय गुंतवणुकीतील रक्कम योजनेत सहभागी पतसंस्थेस काढता येणार नाही अथवा त्यावर ओव्हरड्राफ्ट घेता येणार नाही

२००३ साली झाला होता प्रयोगn तत्कालीन सहकार आयुक्त रत्नाकर गायकवाड आणि उमेशचंद्र सरंगी यांच्या मार्गदर्शनाखाली १ जुलै २००३ साली डिपॉझिट गॅरंटी कॉर्पोरेशनची स्थापनाn विमा शब्द न वापरता हमी (गॅरंटी) या शब्दाला इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ॲथोरिटीने परवानगी दिली नाहीn सरकारची हमी नसल्याने पतसंस्थांनी दाखविलेली उदासीनता, या कारणांमुळे हा प्रयोग तीन वर्षांत गुंडाळावा लागला

पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण मिळावे यासाठी पतसंस्था फेडरेशनने वेगळे मॉडेल विकसित केले आहे. पतसंस्थांमधील रोखतेवर आधारित संरक्षण ठेवींना दिले जाणार आहे. अहमदनगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून हा प्रयोग केला जात आहे. त्याचे अधिक विश्लेषण करुन नीती आयोग आणि डिपॉझिट इन्शुरन्स क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनसमोर सादरीकरण केले जाईल. पतसंस्थांमधील ठेवींना संरक्षण देण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग होणे गरजेचे आहे. - सतीश मराठे, संचालक, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र