शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : कोरोनाचा आणखी एक पॉझिटिव्ह, रूग्णांची संख्या नऊवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 22:23 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या आस्थापनांना शासनाचे सुट्टी दिलेली आहे.

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती व नवीन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत एकूण ६५ व्यक्तीचे घश्यातील द्रव्याचे नमुने पुण्यातील एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी ९ जणांचे नमुने कोरोना पॉझिटीव्ह आले असून ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.  उर्वरित ११ जणांचे अहवाल उद्यापर्यंत येणार आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात करोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी शाळा, महाविद्यालये, गर्दीच्या आस्थापनांना शासनाचे सुट्टी दिलेली आहे. त्यामुळे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की अत्यावश्यक करणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. करोना आजाराची लक्षणे दिसून आल्यास नागरीकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केले आहे.महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती व नविन भोसरी रुग्णालयात कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही रुग्णालयांत आयसोलेशन कक्ष तयार केला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ‘‘एकुण ६५ व्यक्तीचे घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ४५ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना  घरी सोडले आहे.  उपचारार्थ दाखल ०९ रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. इतर ११ व्यक्तींचा करोना करीता घश्यातील द्रावाचा तपासणी अहवाल प्रलंबित आहे.’’

याशिवाय, "आज नऊ जणांचे अहवाल आले. त्यात ०८ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह व एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटीव्ह आलेला आहे.   या सर्व व्यक्ती  दि. ०६ ते ०९ मार्च या कालखंडात दुबई व जपान येथे प्रवास करुन आलेले होते. त्यांना लक्षणे आढळल्यामुळे त्यांची तपासणी केली होती. ०९ रुग्णांच्या  संपर्कात आलेले नातेवाईक व इतरांची माहिती घेऊन त्यांनाही होम क्वॉरटाईनमध्ये ठेवले आहे", असे श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. 

याचबरोबर, रुग्णांचे सर्वेक्षण करण्यासाठी वैद्यकीय विभागामार्फत ३७ जलद प्रतिसाद चमु तयार केला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फेत  सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व मनपा दवाखाना रुग्णालय प्रमुखांना त्यांचेकडे परदेशातून आलेले नागरिक तपासणी करीता येत असल्यास माहिती कळविण्याची सूचना केली आहे, असेही श्रावण हर्डीकर म्हणाले.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड