शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

Corona Virus : चिंताजनक! पिंपरीत बुधवारी १ हजार २४८ जण कोरोना पॉझिटिव्ह; ६१५ जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 21:33 IST

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे.

पिंपरी : संशयित रुग्णांच्या तपासण्याची संख्या वाढल्याने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात १ हजार २४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.तर दिवसभरात ६१५ जण कोरोनामुक्त  झाले आहे. तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  

पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीतील कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात ६ हजार ३९० जणांना दाखल केले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशांतील द्रवाच्या नमुण्यांपैकी ५ हजार ४०७२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १ हजार ५०६ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. तर दाखल रुग्णांची संख्या १ हजार ७५९ वर पोहोचली आहे. ७ हजार ४३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.  निगडी प्राधिकरण, थेरगाव, सांगवी आणि भोसरी परिसरात धोका वाढला आहे......... कोरोनामुक्त घटलेगेल्या महिनाभरात सर्वाधिक कोरोनामुक्त झाले असून ६१५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, पॉझिटिव्ह रुग्णांच्या तुलनेत ही संख्या निम्मी आहे. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ७ हजार ९६ वर  गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख १६ हजार ८९६ वर पोहोचली आहे. मृतांमध्ये पिंपरीतील ५८ वर्षीय पुरूषाचा आणि पिंपळेनिलख येथील ८० वर्षीय, फुगेवाडीतील ९४ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आजपर्यंत कोरोनामुळे मृत होणाºयांची संख्या १ हजार ८८३ वर पोहोचली आहे. सर्वच प्रभागातील रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे.  ...............गाव   रुग्णसंख्या अ प्रभाग   १९७ ब प्रभाग १६९ क प्रभाग   १६८ ड प्रभाग १९७ इ प्रभाग १४२ फ प्रभाग १२६ ग प्रभाग १४० ह प्रभाग   १०९..............................एकुण १२४८

........................... लसीकरण मंदावले

मागील आठवड्यात वाढलेले लसीकरण आता मंदावले आहे.  शहर परिसरातील आठ शासकीय केंद्रावर तसेच ११ खासगी रुग्णालयातही लसीकरण सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  ३ हजार ९९९ जणांना लसीकरण करण्यात आले. आजपर्यंत एकूण ७६ हजार ८१३ जणांना कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली............................

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसcommissionerआयुक्त