शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी, पिंपरीत बालरोग उपचारासाठी 'टास्क फोर्स'ची निर्मिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 21:31 IST

कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे....

पिंपरी : कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचेही वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेने उपाययोजना सुरु केल्या आहेत. लहान मुलांचे कोविडवरील उपचार, अतिदक्षता विभाग, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, मार्गदर्शन, संचलन याबाबत बालरोग तज्ज्ञांची सहा सदस्यसीय टास्क फोर्स निर्माण केली आहे, अशी माहिती आयुक्त राजेश पाटील यांनी दिली. पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतची धोक्याची सूचना दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने उपाययोजना केल्या जात आहे............................अशी आहे टीमयशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील बालरोग विभागाच्या प्राध्यापिका डॉ. दिपाली अंबिके, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या बालरोग विभागाचे प्राध्यापक डॉ. शरद अगरखेडकर, आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. राहुल कल्याणपुरकर, युनिक हॉस्पिटलचे नियो-न्युटोलॉजिस्ट डॉ. सुधीर माळवदे, स्टर्लिंग हॉस्पिटलचे बालरोग इटेन्सीव्हीस्ट डॉ. मनोज पाटील आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. संदीप शिंदे यांचा टास्क फोर्समध्ये समावेश आहे.......................आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ‘पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याबाबतची धोक्याची सूचना दिली आहे. या लाटेत लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता वर्तविली आहे. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेवून महापालिका हद्दीतील महापालिका, खासगी रुग्णालयातील बालरोग तज्ञ यांना लहान मुलांचे कोविडवरील उपचार व लहान मुलांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) व्यवस्था तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना, मार्गदर्शन,  संचलन याबाबत करावयाचे कामकाजासाठी टीम तयार केली आहे.’’.................टास्क फोर्स काय करणार१)  महापालिका हद्दीतील महापालिका, खासगी रुग्णालयातील लहान मुलांसाठी उपचाराबाबतीत मार्गदर्शक तत्वे निर्माण करणार.२) उपाययोजना आणि बाल रुग्ण उपचारांबाबत माहिती देणे आणि  संचलनासाठी सूचना केल्या जाणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्तhospitalहॉस्पिटल