शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Corona Virus In Pimpri : पिंपरी चिंचवडमध्ये दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा होतोय घट्ट; शनिवारी २ हजार ८३२ नवे पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 21:05 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ

पिंपरी : महापालिका परिसरातील दाट लोकवस्तीत कोरोनाचा विळखा वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांनी आज उच्चांक गाठला आहे.   दिवसभरात २ हजार ८३२ रुग्ण सापडले असून १ हजार ८५४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पंधरा जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर ५ हजार ०१ जणांना डिस्चार्ज दिला आहे. चिंचवड, सांगवी, भोसरी, सांगवी या भागातील दाट लोकवस्तीत कोरोना वाढला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात कोरोना रुग्णांत वाढ होत आहे. काल २४०० आलेली रुग्णसंख्या चारशेंनी  वाढली आहे. महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयात ५ हजार ९८१ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पुण्यातील एनआयव्हीकडे पाठविलेल्या रुग्णांच्या घशातील द्रवाच्या नमुण्यांपैकी २ हजार ४०२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर २ हजार २९३ जणांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे दाखल रुग्णांची संख्या ३ हजार ३९३ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज पाच हजार एक जणांना डिस्चार्ज दिला आहे.............................कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनामुक्त रुग्णांची संख्याही वाढत आहे. कालच्या तलनेत पाचशेंनी अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख २४ हजार ८४४ वर गेली आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ४७ हजार ५४६ वर गेली आहे...................................पंधरा जणांचा बळीकोरोनामुळे मृत होणाऱ्यांची संख्या आज वाढली आहे. शहरातील १५ आणि शहराबाहेरील २ अशा एकूण १७ जणांचा बळी घेतला आहे. त्यात शहरातील ११ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. त्यात तरुण आणि ज्येष्ठांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मृतांची संख्या २ हजार ०४९ वर पोहोचली आहे.......................१४ हजार जणांना लसीकरणकोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग वाढला आहे. शहरातील महापालिकेच्या ५० आणि खासगी २९ अशा एकूण ७९ केंद्रावर लसीकरण सुरू आहे. महापालिका रुग्णालयात ११ हजार २५९ जणांना लसीकरण करण्यात आहे. तर खासगी रुग्णालयांसह ४ हजार ६७०  जणांना लस देण्यात आली. वयवर्षे ४५ पेक्षा अधिक असणाºया १२ हजार ६१५ जणांना लस देण्यात आली. त्यामुळे एकूण लसीकरण झालेल्यांची संख्या १ लाख ७४ हजार ७४६ वर पोहोचली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलcommissionerआयुक्त