शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News : पिंपरी शहरात १२० नवे रुग्ण, ३९ जण कोरोनामुक्त; एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 19:49 IST

पिंपरी शहरात गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत..

पिंपरी : शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभराच्या आत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दररोज शंभरापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे पुन्हा चिंता व्यक्त केली जात आहे. शहरात शनिवारी दिवसभरात १२० जणांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर ३९ जण कोरोनामुक्त झाले.

शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक लाख एक हजार ६१८ झाली आहे. शहरात शनिवारी महापालिका हद्दीतील एका रुग्णाचा मृत्यू झाला. महापालिका हद्दीतील कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या आतापर्यंत १८२७ झाली आहे, तर महापालिका हद्दीबाहेरील ७६९ रुग्ण शहरात उपचारादरम्यान दगावले आहेत. शनिवारी दिवसभरात ११२६ संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल झाले. तसेच दिवसभरात ८०३ जणांचे कोरोना तपासणीचे अहवाल निगेटिव्ह आले. ९१४ जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल प्रलंबित आहेत. रुग्णालयातून १०४५ जणांना घरी सोडण्यात आले. तर ६७७ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेरील १०७ रुग्ण शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. महापालिका हद्दीबाहेरील ७७५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर महापालिका हद्दीतील ९७९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील रहिवासी असलेले कोरोना पॉझिटिव्ह १०८ रुग्ण शहराबाहेरील रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

शहरात ११७४ रुग्णांचे गृहविलगीकरणकोरोना पॉझिटिव्ह असलेले ६७७ सक्रीय रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर सक्रीय असलेल्या ११७४ रुग्णांचे गृहविलगीकरण करण्यात आले आहे. असे एकूण १८५१ सक्रीय रुग्ण शहरात आहेत. शनिवारी दिवसभरात ३१५ घरांना भेटी देऊन १०८४ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर