शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे आठ लाख लोकांमध्ये आढळल्या 'कोरोना अँटिबॉडीज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 12:10 IST

दिवाळी सण, हिवाळा असल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही...

ठळक मुद्देपुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झाल्याचा सर्वेक्षण निष्कर्ष

पिंपरी: महानगरपालिका परिसरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झाला आहे, नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे का ? यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये शहरातील ते ३३.९ टक्के जणांना कोरोना होऊन गेल्याचा निष्कर्ष निघाला आहे. एकूण लोकसंख्येच्या सुमारे आठ लाख नागरिकांना कोरोना झाल्याचे आढळून आले आहे. 

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात अँटिबॉडी निर्माण झाल्याचे सर्वेक्षण निष्कर्ष सांगतो. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि डॉ. डी वाय पाटील मेडिकल कॉलेज रिसर्च सेंटर च्या वतीने दिनांक ७ ते १७ ऑक्‍टोबर रोजी पाहणी करण्यात आली. ........ कसे झाले सर्वेक्षण त्यासाठी विविध २०० भाग निवडून दहा पथके तयार करण्यात आली होती. दहा दिवस सर्वेक्षण करून पाच हजार जणांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते. तसेच आयजीजी अँटिबॉडी तपासणीसाठी आयसीएमआर द्वारे प्रमाणित अबोट सीएमआयए टेस्ट करण्यात आली होती. .......... 

निष्कर्ष एकूण २७ लाख लोकसंख्या लक्षात घेता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३३.९ टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी निर्माण झाल्याचे आढळून आले आहेत. तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये ३७.८ टक्के, झोपडपट्टी सदृश्य भागातील नागरिकांमध्ये ३८.३ टक्के, गृहनिर्माण सोसायटी भागातील नागरिकांमध्ये २७.७ टक्के अँटिबॉडी आढळून आल्या. तसेच ३६.८ टक्के महिलांमध्ये तर २८.९ टक्के पुरुषांमध्ये अँटीबॉडीज आढळून आले आहेत. पुरुषांपेक्षा महिलां मधील अँटीबॉडी अधीक विकसित अधिक असल्याचे दिसून आले आहेत. तसेच ५१ ते ६५ वर्षाच्या नागरिकांमध्ये हे अँटीबॉडीज अधिक आढळून आले आहेत. त्याचा दर ३५.५ इतका आहे तसेच किशोरवयीन बारा ते अठरा वर्षाच्या वयोगटामध्ये ३४.९ टक्के तर १९ ते ३३ या वयोगटांमध्ये २९.७, ३१ ते ५९ वयोगटांमध्ये ३१.२ आणि व ६६ वर्षावरील नागरिकांमध्ये २८.३ टक्के अँटीबॉडीज आढळून आलेले आहे. कोविडमुळे असणारा सर्वसामान्य मृत्यूदर ०.१८ असल्याचे असल्याचा निष्कर्ष संशोधनातून निघाला आहे. ......... पत्रकार परिषदेस महापौर उषा ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके , विरोधी पक्ष नेता राजू मिसाळ, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफने, महिला वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली डांगे, तांत्रिक समिती सल्लागार डॉ. सुभाष साळुंके, डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज डॉ. अमित बॅनर्जी, भार्गव गायकवाड, अतुल देसले आदी उपस्थित होते. 

........

 आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, ''सर्वेक्षणांमध्ये दोनशे ठिकाणे निवडण्यात आले होते. त्यातून एकूण लोकसंख्येपैकी ३३.९ टक्के पॉझिटिव्ह दिसून आल्याचे सर्वेक्षणातून दिसते. दिवाळी सण, हिवाळा असल्यामुळे कोरोना विषाणूचे संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, सूचनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.''

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcorona virusकोरोना वायरस बातम्याshravan hardikarश्रावण हर्डिकरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका