शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्तीमुळे सातत्याने अपघात

By admin | Updated: May 9, 2017 03:39 IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून

मुंबई-पुणे एक्सप्रेस (द्रुतगती) महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांना मानवी चुकाच कारणीभूत ठरत आहेत. विविध सर्वेक्षणांतून ही बाब समोर आली असतानाही वाहनचालक बेशिस्तपणे वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत.राजधानी मुंबई व आयटी हब पुणे ही शहरे कमीत कमी वेळात जोडली जावीत याकरिता मुंबई-पुणे या ९४ किमी अंतराच्या देशातील पहिल्या द्रुतगती मार्गाची निर्मिती करण्यात आली. हा महामार्ग जलद प्रवासाबरोबर वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत राहिला आहे. वारंवार होणारे भीषण अपघात व वाहतूककोंडी यामुळे या महामार्गाची ओळख मृत्यूचा महामार्ग वा कासवगती महामार्ग अशी होऊ लागली आहे. द्रुतगतीवर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वेक्षणात या मार्गावरील जवळपास ८० टक्के अपघात हे मानवी चुकांमुळे अर्थात चालकांच्या चुकांमुळे होत असल्याचे समोर आले आहे. या मानवी चुका रोखण्यासाठीही या मार्गावर यंत्रणेने विविध उपाययोजना केल्या. ज्यामध्ये स्पीड गनच्या माध्यमातून वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणणे, कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांची छबी टिपत नियमांचा भंग करणारे कारचालक व लेन कटिंग करणारे अवजड वाहनांचे चालक यांना दंड करणे, लेनची शिस्त वाहनचालकांना समजावी याकरिता माहितीचे बोर्ड लावणे, रस्त्यावर मार्किंग करणे आदी कामे केल्यानंतरही या मार्गावर ना वाहनांचा वेग कमी झाला, ना लेन कटिंगची समस्या कमी झाली. वारंवार या घटना व अपघातांची पुनरावृत्ती होत असतानाही वाहन चालकांकडून शिस्तव नियमांचे पालन केले जात नाही.वारंवार मानवी चुकांमुळे अपघात होत असतानाही चालक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे दुदैव म्हणावे लागेल.