शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस गटबाजीचे ग्रहण सुटणार?

By admin | Updated: October 2, 2015 00:57 IST

पिंपरी-चिंचवड शहर काँगे्रसमधील गटबाजी, विरोधी पक्षनेतेपद यासह भोईर, नढे यांचे निलंबन आदी मुद्द्यांवरून बुधवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर काँगे्रसमधील गटबाजी, विरोधी पक्षनेतेपद यासह भोईर, नढे यांचे निलंबन आदी मुद्द्यांवरून बुधवारी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्या; निलंबन मागे घेऊ, असे प्रदेशाध्यक्षांनी भोईर व नढे यांना सुचविले आहे. असे झाल्यास काँगे्रसमधील गटबाजी संपुष्टात येऊन शहरात पक्षाला ‘अच्छे दिन’ येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांनी पिंपरी-चिंचवड शहरात लक्ष घातले आहे. पक्षाला बळकटी देण्यासह अंतर्गत वाद मिटविण्याकडे त्यांचे अधिक लक्ष आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मेळावा घेतला. तर दोनच दिवसांपूर्वी पक्षनिरीक्षक मधु चव्हाण आणि तुकाराम रेगे यांनी कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सर्वांचे म्हणणे जाणून घेतले. त्यानंतर पुन्हा बुधवारी मुंबईत बैठक घेण्यात आली. या बैठकीला कॉँगे्रसच्या दोन्ही गटांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. सर्वांना एकत्रित आणून पक्षाची ताकत कशी वाढविता येईल, यावर विशेष चर्चा करण्यात आली. दरम्यान, विरोधी पक्षनेतेपद आणि भोईर, नढे यांचे निलंबन याबाबतही चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पक्षाचा आदेश डावलल्याने भाऊसाहेब भोईर व विनोद नढे यांना पक्षातून निलंबित केले होते. दरम्यान, हे निलंबन मागे घ्यायचे असल्यास प्रथम नढे यांनी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भोईर गटाला सुचविले. राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एक बैठक घेण्यात येईल, त्यानंतर निलंबन मागे घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)