शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वर्गीकरणावरून गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 03:14 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरतूद वर्गीकरणाच्या विषयावरून गोंधळ झाला. मतदान झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लोबोल केले

पिंपरी : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत तरतूद वर्गीकरणाच्या विषयावरून गोंधळ झाला. मतदान झाले. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लोबोल केले. आयुक्तांना विषय माघारीचे पत्र दिले असतानाही सत्ताधाºयांनी बहुमताच्या जोरावर मंजुरी दिली. त्यानुसार भोसरी, इंद्रायणीनगर प्रभागातील रस्त्यांच्या कामावरील तरतूद शून्य केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेतील उपसूचना आणि तरतूद वर्गीकरणाची राष्टÑवादी काँग्रेसची परंपरा भाजपानेही सुरू ठेवली आहे. अखर्चित रकमेच्या २५७ कोटी रुपयांची तरतूद वर्गीकरणाचा विषय सर्वसाधारण सभेपुढे चर्चेला आल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी यावर आक्षेप घेतला होता. स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी आयुक्तांना धारेवर धरले होते. सत्ताधारी नगरसेवकांनीच विरोध केल्याने मागील सभेत एक विषय मागे ठेऊन सभा तहकूब केली होती. त्यानंतर तहकूब सभा बुधवारी झाली. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते.सभा कामकाज सुरू होतानाच नगरसचिव उल्हास जगताप यांनी आयुक्तांनी वर्गीकरणाचे पाचही प्रस्ताव मागे घेत असल्याचे लेखी पत्र दिले आहे, असे सांंगितले. एक विषय मागील सभेतच तहकूब केला होता. त्यामुळे पुढील सभेत यावर निर्णय होईल, असे सांगितले. त्यानंतर वर्गीकरणाच्या पुढील विषयावर चर्चा सुरू झाली. त्या वेळी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आक्षेप घेतला. आयुक्तांनी विषय मागे घेतल्यानंतर चर्चा आणि दुसरे विषय मंजूर कसे केले जात आहेत, असा आक्षेप घेतला. त्यावर नगरसचिवांनी खुलासा केला. ते म्हणाले, आयुक्तांनी विषय मागे घेतले असले तरी हा विषय सभेच्या पटलावर आहे़ याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेचा आहे. त्यामुळे सभागृहाने निर्णय घ्यावा, असे सांगितले.नगरसेवक अजित गव्हाणे म्हणाले, ‘‘वर्गीकरणाचे विषय तातडीची बाब म्हणून दाखल करून घेणे चुकीचे आहे. वर्गीकरणाचे विषय मागे घेणे प्रशासनाची मोठी चूक आहे. आयुक्त सत्ताधाºयांच्या दबावाखाली कामकाज करत असल्याचे दिसून येत आहे. आजपर्यंतच्या प्रत्येक आयुक्तांनी कामाची छाप पाडली. मात्र, हर्डीकर यांना अद्यापपर्यंत कामाची छाप पाडता आली नाही. ’’जनतेची मागणी नसताना रस्ते कशासाठी? आमच्याकडे डांबरीकरणावर ११ कोटींचा खर्च केला आहे, असे संजय वाबळे यांनी सांगितले. सर्वांना निधी मिळावा, अशी मागणी जावेद शेख यांनी केली. ‘आयुक्तांवर आणि महापौरांवर कोणताही दबाव नाही. दबाव काय असतो. ते यापूर्वीच्या महापौरांना विचारा, त्यांना गोळ्या खाव्या लागत होत्या, असे उषा मुंडे म्हणाल्या. प्रियंका बारसे यांनी प्रभागातील रस्त्याची समस्या मांडली.विलास मडिगेरी म्हणाले, ‘‘कोणाचाही निधी पळविलेला नाही. ही अखर्चित रक्कम होती.’’आयुक्त एखादा विषय आणतात पुन्हा मागे घेतात. हा काय प्रकार आहे. याचा खुलासा व्हावा. आयुक्तांनी माघारी घेण्याचे पत्र दिले असतानादेखील सत्ताधारी विषय कसा काय? मंजूर करून घेऊ शकतात. सत्ताधाºयांकडून चुकीच्या पद्धतीने सभागृह चालविले जात आहे. प्रत्येक सभेत उपसूचनांचा पाऊस पडत आहे. वर्गीकरणाच्या विषयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा तीव्र विरोध आहे. सत्ताधाºयांनी रीतसर विषयपत्रिकेवर विषय आणावेत.- दत्ता साने, विरोधी पक्षनेतेआमच्याकडे माणूस, पक्ष पाहून वर्गीकरण केले जात नाही. अर्थसंकल्पात सर्वांना निधी देण्याचा प्रयत्न केला आहे. शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही वॉर्डाचा निधी पळविलेला अखर्चित रकमेचे नियोजन केले आहे. रस्त्यांवरील खर्च कमी करण्यासाठी सिमेंटच्या रस्त्याबाबत धोरण होणे गरजेचे आहे. प्रस्तावाच्या बाजूने ६६ तर विरोधात ३७ मते पडली. त्यानंतर विषय मंजूर केला.- एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते