शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्तांसाठी व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 07:01 IST

स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच जारी झाला असून, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक

संजय मानेपिंपरी : स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबतचा शासनाचा अध्यादेश नुकताच जारी झाला असून, पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या व्यक्तीची आयुक्तपदावर नेमणूक केली जाणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आगामी लोकसभा, विधानसभेची २०१९ ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून सत्ताधारी भाजपाकडून आयुक्तपदासाठीच्या अधिकाºयांच्या नावाची शिफारस होणार आहे. त्यातही पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र आयुक्तालय होणार आहे़ त्या ठिकाणी पोलीस आयुक्त कोण असावेत? यासंदर्भात स्थानिक आमदारांच्या शिफारशीला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणूक लढण्याची पूर्वतयारी करताना, पक्ष संघटन, कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बांधणी, निधीची उपलब्धता, मतदारांवर प्रभाव याचबरोबर पोलीस यंत्रणेचा खुबीने वापर याचाही विचार राजकीय मंडळी वरिष्ठ पातळीवर करत असतात. निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाºयांच्या बदल्या केल्या जातात. आयुक्तालय कोणाच्या मतदारसंघात असावे, यापासून ते तेथे महत्त्वाच्या पदावरील अधिकारी कोण असावेत? याची राजकीय पातळीवर व्यूहरचना केली जात आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयास नव्या पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा बहुमान मिळणार आहे. राजकीय समीकरणे कशीही जुळविली जात असली तरी नव्या आयुक्तालयाचे पहिले आयुक्त होण्यास अनेक अधिकारी इच्छुक आहेत.पोलीस खात्यातील अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाºयांमध्ये रितेश कुमार, प्रज्ञा सरवदे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील बिपीन के़ सिंग, व्ही. व्ही. फणसाळकर, नवी मुंबई येथील पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असलेले हेमंत नगराळे, नागपूरचे पोलीस आयुक्त के़ व्यंकटेशन, दहशतवाद विरोधी पथकाचे अतुलचंद्र कुलकर्णी, गुन्हे प्रकटीकरण विभागाचे संजय कुमार, महामार्ग सुरक्षा, वाहतूक विभागाचे आऱ के़ पद्मनाभन, पोलीस प्रशिक्षण केंद्राचे एस़ जगन्नाथन, रेल्वे विभागाचे जयजित सिंग, स्पेशल आॅपरेशन्स विभागाचे डी़ कनकरन्तनम, राज्य इंटलिजन्स विभागाचे संजय बर्वे, ठाणे शहराचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच सुबोध जैस्वाल आदींचा समावेश आहे. या अधिकाºयांपैकी एक अधिकारी लवकरच नव्या पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्तपदी विराजमान होणार आहेत.