पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका मिळकतकर विभागातील संगणकप्रणाली अद्ययावतीकरणाच्या ३३.२० लाखांच्या खर्चास, तसेच निगडीतील उड्डाणपुलाच्या कामास सल्लागार नियुक्त करण्याच्या ऐन वेळेसच्या विषयास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. महापालिकेच्या करआकारणी आणि करसंकलन विभागाचे संगणकीकरण केले असून, संगणकप्रणाली अद्ययावत करण्यासाठी दोन वर्षे मुदतीच्या या कामाची ३४ लाख १० हजार रुपयांची निविदा काढली आहे. त्यासाठी तीन ठेकेदारांनी निविदा भरल्या. त्यापैकी एका ठेकेदाराची ३३ लाख २० हजारांची निविदा मंजूर करण्यात आली. दापोडीत पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. तसेच स्थापत्यविषयक कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी एका कंपनीस प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. चिंचवड येथे प्रभाग क्रमांक २७ मध्ये राजर्षी शाहू पुतळ्याजवळ शाहूसृष्टी उभारण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याच्या ऐनवेळसच्या विषयास मंजुरी दिली. शाहूसृष्टीच्या कामाचा आराखडा करणे, त्यांचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या विषयासही मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)पिंपरी कॅम्पातील चाळींचा सुधारित मंजूर योजनेनुसार दाट वस्तीत समावेश पिंपरी : येथील पिंपरी कॅम्प या परिसरात सिंधी बांधव वास्तव्यास आहेत. सिंधी वस्तीतील चाळींचा समावेश महापालिकेच्या सुधारित मंजूर योजनेनुसार दाट वस्तीत करण्याच्या ठरावास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी डब्बू आसवानी होते. स्वातंत्र्यानंतर पिंपरी येथे आलेल्या निर्वासितांची वसाहत म्हणजेच पिंपरी छावणी १९४९ सुरू झाली. तेव्हापासून येथे सिंधी बांधव वास्तव्यास आहेत. येथील चाळी कमी क्षेत्रांच्या जागेत उभ्या आहेत. अरुंद जागेवर बांधलेल्या चाळी दाट घनतेच्या आहेत. मात्र, पिंपरी चिंचवड शहराच्या जुन्या हद्दीच्या मंजूर विकास योजनेमध्ये या चाळींचा उल्लेख दाटवस्ती क्षेत्र म्हणून दर्शविलेला नाही. त्यामुळे या चाळींचा आणि तेथील आजुबाजूच्या परिसराचा विकास करणे, विकास नियंत्रण नियमानुसार शक्य होत नाही. याबाबत प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने स्थायीचे अध्यक्ष डब्बू आसवानी यांनी आजच्या बैठकीत हा ऐनवेळी ठेवला. (प्रतिनिधी)
संगणक प्रणाली होणार अद्ययावत
By admin | Updated: July 13, 2016 00:30 IST