शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारपेट्या कुचकामी; महाविद्यालयांचा निरुत्साह, विद्यार्थिनींच्या छेडछाडीच्या घटनांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 04:32 IST

छेड काढणारे, तसेच टवाळखोर यांच्याकडून त्रास होत असल्यास विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेटीत टाकावी, त्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरी : छेड काढणारे, तसेच टवाळखोर यांच्याकडून त्रास होत असल्यास विद्यार्थिनींनी त्यांची तक्रार महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेटीत टाकावी, त्या तक्रारीची दखल घेऊन उपाययोजना केल्या जातील, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, अनेक महाविद्यालये तक्रार पेट्या लावत नाहीत, पेट्या ठेवल्यातरी त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे विद्यार्थिनींसाठी ठेवलेल्या तक्रार पेट्या कुचकामी ठरत आहेत.शहरात विविध ठिकाणी, तसेच महाविद्यालयांजवळ टवाळखोरांकडून विद्यार्र्थिनींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. छेडछाडीच्या घटनांबद्दल नागरिक तक्रार करतात. मुली असुरक्षित असल्याबद्दल पालक असुरक्षितता व्यक्त करतात. महाविद्यालयात लावलेल्या तक्रार पेट्यांमधून मात्र विद्यार्र्थिनींच्या तक्रारी का दिसून येत नाहीत, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. तक्रारदार विद्यार्र्थिनीने नाव न लिहिता तक्रार नोंदवली, तरी त्याची दखल घेतली जाते. विद्यार्र्थिनीचे नाव गोपनीय ठेवले जाते. असे असतानाही महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मुलींची छेडछाड होत नसावी वा टवाळखोर, छेडछाड करणारी टोळकी बाहेरची असावीत, असा एक मुद्दा पुढे आला आहे. महाविद्यालयात शिक्षण न घेणारे बाहेरचे तरुण महाविद्यालयाच्या आवारात अथवा महाविद्यालयाजवळ टवाळखोरी करतात. अशा टवाळखोरांबद्दल तक्रार देण्यास विद्यार्र्थिनी धजावत नाहीत.सुरक्षिततेसाठी आयुक्तांचा पुढाकारपुणे शहर पोलिसांनी महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली आहे. पोलीस काका, बडी कॉप, प्रतिसाद अ‍ॅप या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, संकटाच्या वेळी महिला अथवा मुलींना त्याचा उपयोग होतो. पोलिसांकडून तातडीची मदत मिळविणे शक्य होते. परंतु, लोकमतने केलेल्या पाहणीत अनेक महाविद्यालयांच्या विद्यार्थिंनीना हेल्पलाईनविषयी माहितीच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हेल्पलाईन उपलब्ध असूनही त्याचा उपयोग होताना दिसत नाही.महिला सुरक्षा जनजागृती अभियानांतर्गत याबाबतची माहिती महिलांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी हिंजवडीत ‘वॉक विथ कमिशनर’ असा उपक्रम राबविला. आयटी क्षेत्रात काम करणाºया तरुणींची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास असल्यास थेट पोलिसांना कळवावे. कठोर कारवाईच्या उपाययोजना राबवून नोकरदार महिला, तसेच महाविद्यालयीन तरुणींना संरक्षण दिले जाईल, अशी ग्वाही पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिली होती. त्यानंतर हिंजवडी, वाकड पोलीस ठाण्यात काही नोकरदार तरुणींनी तक्रारी दिल्या होत्या. त्याचप्रमाणे शहरातील महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांनीच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा