शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त आले अन् कर्मचारी पळाले, हजेरी लावून गप्पा मारणा-यांची उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 06:41 IST

आयुक्तांची मोटार महापालिकेच्या वाहनतळावर आली. प्रवेशद्वारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी

पिंपरी : आयुक्तांची मोटार महापालिकेच्या वाहनतळावर आली. प्रवेशद्वारातून नेहमीप्रमाणे मुख्य प्रशासकीय इमारतीत जाण्याऐवजी सहज पाहणी करण्याच्या उद्देशाने त्यांनी इमारतीच्या पाठीमागील बाजूस फेरफटका मारला.सकाळी ड्युटीवर आल्यानंतर थम केला, हजेरी लागली, आता निवांत झालो असे समजून गप्पा मारणाºयांचे टोळके जमले होते. आयुक्तांना पाहताच कर्मचाºयांची अक्षरश: तारांबळ उडाली.महापालिकेत सकाळी नऊच्या सुमारास आयुक्त श्रावण हर्डीकर दाखल झाले. अनपेक्षितपणे त्यांनी इमारतीच्या मागील बाजूस पायी जाऊन पाहणी केली. कॅन्टीनजवळ कट्ट्यावर कर्मचारी सकाळीच निवांतपणे गप्पा मारत बसल्याचे चित्र त्यांना प्रत्यक्ष पहावयास मिळाले. काही अंतर गेले तो तीच परिस्थिती. आयुक्त आले हे लक्षात येताच, कामचुकार कर्मचाºयांची अक्षरश: तारांबळ उडाली. आपापल्या जागेवर जाऊन बसण्यासाठी कर्मचारी पटकन निघून गेले. महापालिकेत कामचुकार अधिकारी, कर्मचारी यांची संख्या मोठी आहे. सकाळी कार्यालयात यायचे, हजेरी लावायची, पुन्हानिघून जायचे. काही कर्मचारी तर सकाळी महापालिकेत थम्ब केल्यानंतर चक्क दुपारनंतर स्वत:चे दुकान अथवा टपरी चालविताना दिसून येतात. क्रीडा विभागात तर प्रचंड अनागोंदी कारभार आहे.रंगीबेरंगी कपडे, टी शर्ट परिधान करून अधिकारी पुन्हा वावरू लागले. अधिकारी कोण, नागरिक कोण, हे समजणे कठीण झाले. परदेशी यांच्यानंतर राजीव जाधव यांच्या काळातही अधिकारी अधूनमधून गणवेश वापरताना दिसून येत होते. आता त्यात बदल झाला आहे. बेशिस्त कारभार सुरू आहे. ही परिस्थिती अचानक पाहणी केलेल्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पहावयास मिळाली.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड