शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ लोणावळा, सुंदर लोणावळा; भिंती करू लागल्या समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 12:25 IST

लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहराचे नामांकन मिळवून देण्यासाठी शहरातील स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. दोन दिवसांत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतची भिंत रंगवत उद्बोधक संदेश देणारी चित्रे बनविण्यात आलेली आहे.

ठळक मुद्देशहरातील रिकाम्या भिंतींवर स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देणारी छायाचित्रे रेखाटण्याची कामे सुरुस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतीवर संदेशपर चित्र रंगविण्यासाठी आर्टिस्ट ग्रुपचा पुढाकार

लोणावळा : पर्यटनाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहराला स्वच्छ सर्वेक्षण अभियानात स्वच्छ शहराचे नामांकन मिळवून देण्यासाठी शहरातील स्थानिक कलाकारांनी पुढाकार घेतला आहे. कलाकारांच्या संकल्पनेतून शहरातील रिकाम्या भिंतींवर स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देणारी छायाचित्रे रेखाटण्याची कामे सुरु करण्यात आले. दोन दिवसांत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गालगतची भिंत रंगवत उद्बोधक संदेश देणारी चित्रे बनविण्यात आलेली आहे.स्वच्छ सर्वेक्षण २०१८करिता शहर सज्ज झाले असून, लोकप्रतिनिधी व अधिकारी, कर्मचारी,आर्टिस्ट ग्रुप, संघटना, शाळा व नागरिक यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याचा विडाच उचलण्यात आला आहे. लोणावळा आर्टिस्ट ग्रुपच्या २५ सदस्यांनी शहराला आकर्षक बनविण्यासाठी आपल्या कुंचल्याच्या व रंगछटाच्या माध्यमातून पर्यटकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात येत आहे. गवत व मातीने भरलेल्या भिंतीवर आकर्षक रंगछटा व कलाकृती साकारली गेल्याने त्या भिंती नागरिकांच्या आकर्षण बनू लागल्या आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले. आर्टिस्ट ग्रुपने पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतीवर संदेशपर चित्र रंगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यामध्ये कलाशिक्षक राजेंद्र दिवेकर, सचिन कुटे, धनंजय होनग्गी, बंडू येवले, प्रमोद प्रांचाळ, दत्ता थोरात, संजोग पिसे, सागर तावरे, विशाल केदारी, नितीन तावरे, विशाल बोडके, अभिषेक दरेकर, योगेश पाळेकर, नितीन कल्याण, शिरीष बडेकर, विशाल कुडले, नितीन तिकोणे, दिनेश पवार, भानुप्रिया शर्मा, हिना परमार, स्वराली मुंदरगी, कोलम दुर्गे, स्नेहल राणे, यशश्री तावरे, सुनील गायकवाड, योगेश शिवा, गौरव राशिंगकर, योगेश अंभुरे यांचा समावेश आहे. 

 

पर्यटकांत उत्सुकता : स्वच्छता मोहीमपर्यटक भिंती व चित्रे पाहण्यासाठी आवर्जून थांबत आहेत. शहरातील सर्व भिंती याच धर्तीवर रंगवत स्वच्छतेचा संदेश देण्यात येणार आहे. वेगवेगळे ग्रुप सकाळच्या सत्रात विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत आहेत. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून स्वच्छताविषयक समस्या सोडविल्या जात असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. ओला व सुका कचरा वर्गीकरण करून मिळावा याकरिता झोपडपट्टी भागात प्रत्येकी दोन डस्टबीनचे वाटप सुरु केले आहे. आर्टिस्ट ग्रुपने पर्यटकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी भिंतीवर संदेशपर चित्र रंगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.  शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांनी भेट देत कलाकारांचे कौतुक केले.

टॅग्स :lonavalaलोणावळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड