शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

अभिजात संगीत नाट्यकृतींनी रसिक झाले दंग

By admin | Updated: January 7, 2016 01:07 IST

नादब्रह्म परिवाराच्या महोत्सवी वर्षानिमित्त नादब्रह्म प्रस्तुत मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात रसिकांनी अभिजात संगीत नाट्यकृतींचा आस्वाद घेतला.

पिंपरी : नादब्रह्म परिवाराच्या महोत्सवी वर्षानिमित्त नादब्रह्म प्रस्तुत मा. दीनानाथ मंगेशकर संगीत नाट्य महोत्सवात रसिकांनी अभिजात संगीत नाट्यकृतींचा आस्वाद घेतला. चिंचवड येथे संगीत नाट्य महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. भारतीय स्टेट बँकेचे महाव्यवस्थापक शंतनू पेंडसे हे प्रमुख पाहुणे होते. थोर व्यक्तींना केवळ दंडवत न घालता त्यांचे विचार जनमनापर्यंत पोहोचविले पाहिजेत व ते कार्य कलेच्या माध्यमातून नादब्रह्म परिवार करीत आहे, असे राजदत्त म्हणाले. संस्थेचे सचिव अरुण चितळे यांनी प्रास्ताविक केले. महोत्सवाचा प्रारंभ स्वा. सावरकरलिखित संगीत सन्यस्त खड्ग या नाटकाने झाला. त्यात प्रमोद पवार, डॉ. रवींद्र घांगुर्डे, डॉ. वंदना घांगुर्डे, चिन्मय पाटसकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. नाटक सुरू होण्याआधी अनाहत संगीत अकादमीच्या विद्यार्थ्यांनी नांदी सादर केल्या. नाटकास संगीत साथ आॅर्गन-लीलाय चक्रदेव, तबला-विघ्नहरी देव, व्हायोलिन-अविनाश लघाटे अशी होती. संगीत दिग्दर्शन डॉ. रवींद्र घांगुर्डे यांचे होते. नाटकाच्या निर्मात्या डॉ. वंदना घांगुर्डे आहेत. या प्रसंगी स्वा. सावरकरांचा जीवनपट उलगडणारे चित्रप्रदर्शन भरवण्यात आले होते.दि. ३ जानेवारी रोजी अलौकिक प्रतिभेच्या कवींच्या कविता व गीते आधारित शब्दांचीच रत्ने हा कार्यक्रम सादर झाला. सावनी रवींद्र यांच्या कार्यक्रमाचा प्रारंभ याच महोत्सवात झाला. कवी वैभव जोशी व प्रमोद पवार यांचा सहभाग आहे. (प्रतिनिधी)