शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शास्तीकरात सवलत मिळाल्याचा दावा

By admin | Updated: February 8, 2017 23:21 IST

शास्तीकरात सवलत मिळाल्याचा दावा

 

 

 

पिंपरी : महापालिकेची रणधुमाळी रंगात येत असताना अनधिकृत बांधकामे शास्तीचा निर्णय झाला आहे, शासनाने अधिसूचना काढून तीन टप्प्यांत सवलत दिली आहे. त्यामुळे एक लाख मिळकतधारकांना फायदा होणार असल्याचा दावा भाजपाने केला आहे.यासंबंधी कोणतीही अधिकृत अधिसूचना  महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसल्याचे दिसून आले.

पिंपरी-चिंचवड  शास्तीकरात राज्य शासनाने दिलेल्या सवलतींची माहिती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपतर्फे आज पत्रकार परिषद बोलवली होती. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, राज्यलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन,  प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, सरचिटणीस बाबू नायर, ज्योती ओव्हाळ आदी उपस्थित होते.

 शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी संबंधित अधिसूचनेच्या छायाप्रती पत्रकारांना दिल्या. 

जगताप म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामाच्या बाबतीत प्रतिवर्षी मालमत्ता कराच्या दुप्पट दराने शास्ती आकारण्याची तरतूद केली होती. मात्र, ८जानेवारीमध्ये काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सहाशे चौरस फुटापर्यंतचे निवासी बांधकामाला शास्तीची आकारणी नाही. त्यापुढे एक हजार चौरस फुटापर्यंत निवासी बाधकांमाना प्रतिवर्षी  मालमत्ता कराच्या पन्नास  टक्के शास्ती आकारावी. तसेच त्यापुढील निवासी बांधकामास प्रतिवर्षी मालमत्ताकराच्या दुप्पट दराने शास्ती आकारावी  हा आदेश अकरा जानेवारीला शासनाने प्रसिद्ध केला आहे.’’ 

 आदेश आणि चर्चा 

भाजपच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार  संकेतस्थळावर  संकेतिक क्रमांकाने अधिसूचना उपलब्ध असल्याचे भाजपाने सांगितले. मात्र, यासबंधी महाराष्ट्र शासानाच्या  संकेतस्थळावर शास्तीकरातील सुधारणेचा आठ आणि अकरा जानेवारी दरम्यान कोणतीही अधिसूचना उपलब्ध नाही. त्यामुळे या आदेशाबाबत चर्चा आहे.

जगताप म्हणाले, ‘‘भाजपाने १२५ जागांवर अधिकृत उमेदवार दिले असून तीन उमेदवार पुरस्कुत केले आहेत. भोसरीतील गवळीनगर, थेरगाव आणि वाकड अशा तीन प्रभागात उमेदवार पुरस्कृत केले आहेत. तसेच आरपीआचीही मनधरणी केली आहे. त्यांना पिंपरी, दापोडी, किवळे, यमुनानगर आणि वाकड येथील जागा सोडल्या आहेत. आरपीआयचे उमेदवार भाजपाच्या पक्षचिन्हावर लढणार आहेत. एकोणीस आणि वीस हे प्रभाग आणि संततुकारामनगर हा प्रभाग संवेदनशील जाहीर करावा.’’