शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

मुद्रांकासाठी नागरिकांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 01:07 IST

आठवड्यापासून तुटवडा : जमीन खरेदी-विक्रीसह शहरवासीयांच्या न्यायालयीन कामकाजावर परिणाम

रावेत : घराची खरेदी करताना कर्ज आणि अन्य बाबींसाठी मुद्रांकाची (स्टॅम्प पेपर) गरज असते. पिंपरी-चिंचवडकरांना मात्र मुद्रांकाच्या शोधात शनिवारी वणवण फिरावे लागले. शहरातील अनेक मुद्रांक विक्रेत्यांकडे मागील आठवड्यापासून मुद्रांकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यातच शनिवारी मुद्रांकांचा तुटवडा सर्वत्र होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले.

जागेच्या खरेदी विक्रीच्या कागदपत्रांसाठी, कार्यालयीन काम आणि विविध करांरासाठी मुद्रांकांची गरज भासते. त्याचबरोबर विविध योजनांच्या लाभासाठी, महसूल तसेच इतर विभागाशी संबंधित विविध कामांसाठी वेगवेगळी करारनामे, प्रतिज्ञालेख आदींसाठी मुद्रांकांची आवश्यकता भासते. अनेक शासकीय कामांसाठी मुद्रांक महत्त्वाचा ठरतो. त्यात मोठ्या कामांसाठी मोठ्या रकमेचे स्टॅम्पपेपर वापरले जातात. शहरात वेगवेगळ्या पद्धतीचे मोठे व्यवहार होत असल्याने स्टॅम्पपेपरची मागणीही मोठी आहे. त्यातून दिवसाला हजारो रुपयांची उलाढाल होते. यासाठी शासनमान्य अनेक मुद्रांक विक्रेते असून, ते वेगवेगळ्या ठिकाणी मुद्रांक विक्री करताना दिसतात. शनिवारी या विक्रेत्यांकडे १००, ५०० आणि एक हजार रुपयांच्या मुद्रांकांचा तुटवडा होता.जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत पिंपरी-चिंचवड शहरात व ग्रामीण भागात मुद्रांक विक्रेत्यांना पाचशे, एक हजार व शंभर रुपयांचे मुद्रांक दिले जातात. या कार्यालयातून विक्रेते दिवसाला किती मुद्रांक घेऊन जातात, याची नोंद असते. बँकेत चलन भरल्यानंतर गर्व्हन्मेंट रिसिट अकाउंटिंग सिस्टीम या प्रणालीत ही माहिती दिसते. त्यानंतर मुद्रांक विक्रेत्यांना चलन रद्द करून मुद्रांक दिले जातात. एक चलन भरल्यानंतर एक व्यवहार केला जातो. पोलीस बंदोबस्तात कोषागार कार्यालयात मुद्रांक आणले जातात.मोरवाडी न्यायालयातही मुद्रांक तुटवडा४शहर आणि परिसरातील न्यायालयीन कामकाजासाठी मोरवाडी न्यायालयात नागरिकांना चकरा माराव्या लागतात. शनिवारी न्यायालयीन कामकाजासाठी आलेल्या पक्षकार आणि वकिलांना मुद्रांकांच्या तुटवड्याला सामोरे जावे लागले. न्यायालयाबाहेर नोटरी करणाऱ्या वकिलांना मुद्रांकाअभावी काम करणे अवघड झाले होते.४अनेक विक्रेत्यांनी आज मुद्रांक विक्री बंद आहे, असे फलक लावले होते. काही नागरिकांनी पिंपरी येथील एका विक्रेत्याकडे मुद्रांक मिळविण्यासाठी गर्दी केली होती. मुद्रांक मिळविण्यासाठी नागरिकांना रांगेत तासंतास ताटकळावे लागले. एक व्यक्ती एका वेळेस दहा ते बारा मुद्रांक खरेदी करत असल्याने त्याची नोंदणी करताना विक्रेत्याची दमछाक होत होती.मुद्रांकाची जादा दराने विक्रीमुद्रांकाचा सध्या तुटवडा आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक ११० रुपयांना, ५०० रुपयांचा मुद्रांक ५५० रुपयांना विकण्यात येत होता. जादा दराने विक्री करून विक्रेत्यांनी स्थानिक जनतेला सध्या वेठीस धरले आहे. मात्र मुद्रांक विक्रेत्यांच्या महत्त्वाच्या व्यक्तींना मात्र ते सहज दिले जातात. शहरातील सर्व सरकारी कार्यालयांत मुद्रांक मिळत नसल्याने लाभार्थ्यांना नाईलाजाने जादा दराने खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.नवीन वर्षाची सुरवातच आम्हा वकील बांधवांची मुद्रांक तुटवड्याला सामोरे जाऊन झाली आहे. १ जानेवारीपासून विशेषत: ५०० रुपयांच्या मुद्रांकाचा तुटवडा आहे. त्यामुळे मोरवाडी न्यायालयात पक्षकार आणि वकिलांना कामकाज करता आले नाही. अनेक शासकीय कामकाजासाठी नोटरी करणे आवश्यक असते. परंतु मुद्रांकाच्या तुटवड्यामुळे नोटरी करता आली नाही. गेल्या काही दिवसांपासून कामकाजाविना वकिलांना न्यायालयाच्या आवारात थांबावे लागत आहे.- अ‍ॅड. योगेश थंबा, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड अ‍ॅड. बार असोसिएशनमाझ्या कार्यालयीन कामासाठी मला ५०० रुपयांच्या मुद्रांकाची आवश्यकता होती. शहरातील अनेक विक्रेत्यांकडे सकाळपासून फिरत आहे. परंतु मला शहरात कोठेही मुद्रांक उपलब्ध झाला नाही. पिंपरीत मुद्रांक विक्री चालू आहे, असे समजले. मात्र तेथे तीन तास रांगेत थांबल्यानंतर मला ५० रुपये जादा देऊन ५०० रुपयांचा मुद्रांक मिळाला. - सहदेव भांबुरे, ग्राहक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड