शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासीयांनी दाखवावी सजगता

By admin | Updated: January 6, 2016 00:32 IST

राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली

पिंपरी : राज्यातील आठ विभागांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभाग आघाडीवर आहे. तक्रारींची दखल घेऊन लाचखोरांवर कारवाई करण्यात पुणे विभागाने आघाडी घेतली असली, तरी पिंपरी-चिंचवडकरांचे तक्रारीचे प्रमाण अत्यल्प आहे. गतवर्षात या शहरातील केवळ तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. नागरिकांनी पुढाकार घेऊन सजगता दाखविल्यास पिंपरी-चिंचवडमधील लाचखोरांवर कारवाई करणे शक्य होईल, असा विश्वास लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. रोटरी क्लब आॅफ आकुर्डी-पुणे शाखेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अधीक्षक सरदेशपांडे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘२०१४ या आर्थिक वर्षात संपूर्ण राज्यात आठ विभागांच्या वतीने १२१५ ठिकाणी सापळे लावून लाचखोरांवर कारवाई केली, तर २०१५ या वर्षात लाचखोरांवर कारवाई केल्याची १२३४ प्रकरणे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाने या कार्यालयाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत केलेली कामगिरी राज्यातील अन्य सात विभागांच्या तुलनेने चांगली आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, सांगली आदी ठिकाणी २०१४ मध्ये २१३ ठिकाणी सापळे रचून कारवाई केली होती. तर २०१५ मध्ये २१७ ठिकाणी सापळे रचून यशस्वी कारवाई केली. अधिकाऱ्यांकडे, लोकसेवकाकडे एजंट म्हणून काम करणाऱ्यांविरुद्ध या विभागामार्फत कारवाई केली जाते. अशा व्यक्तींबद्दलच्या तक्रारी देण्यास नागरिकांना पुढाकार घ्यावा. लाच देणे आणि घेणे दोन्ही कृत्यांसाठी कारवाई होऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी लाच देऊन कामे करवून न घेता, रीतसर नियमानुसार कामे करवून घेण्यास प्राधान्य द्यावे.या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील,अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक जालिंदर तांदळे, पोलीस कर्मचारी दीपक टिळेकर यांच्यासह आकुर्डी रोटरी क्लबचे अध्यक्ष राकेश आगरवाल, सचिव आनंद आगरवाल, जसविंदर सोनी, रवी नामदे, सचिन पारेख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)