शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीवर वर्णी लागण्यासाठी चूरस; भोसरी मतदारसंघातील नगरसेवकांना मिळणार असल्याची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 05:14 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ सदस्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून बाहेर पडले. त्याच्या जागेवर पुढील महिन्यात नवीन सदस्य निवडले जाणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतून आठ सदस्य लकी ड्रॉ च्या माध्यमातून बाहेर पडले. त्याच्या जागेवर पुढील महिन्यात नवीन सदस्य निवडले जाणार आहे. लाभाचे पद असणाºया या समितीवर वर्णी लागावी, यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्टÑवादी आणि अपक्ष नगरसेवकांची चूरस लागली आहे. इच्छुकांनी नेत्यांचे उंबरे झिजविण्यास सुरूवात केली आहे. भोसरी विधानसभेला सभापतीपदासाठी संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीमध्ये १६ सदस्य आहेत. यामध्ये भाजपाचे दहा, राष्ट्रवादीचे चार, शिवसेनेचा एक व अपक्ष एक असे सदस्य आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील पहिले आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर बाहेर पडतात. ही नावे चिठ्ठी काढून निश्चित केले जातात. बुधवारच्या स्थायी सभेत सदस्यांचा ‘ड्रॉ’ काढण्यात आला. पहिल्याच चिठ्ठीत अध्यक्षा सीमा सावळे यांचे नाव निघाले. त्यापाठोपाठ कुंदन गायकवाड, उषा मुंडे, हर्षल ढोरे, आशा शेंडगे, कोमल मेवाणी या भाजपाच्या सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर यांच्या नावाच्या चिठ्ठया निघाल्या. त्याच्या जागी अन्य सदस्यांनी वर्णी लागवी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.राष्टÑवादीकडून दोन जणांची नावे दिली जाणार आहेत. लकी ड्रॉ मुळे राष्टÑवादीचे मोरेश्वर भोंडवे, राजू मिसाळ आणि शिवसेनेचे अमित गावडे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे हे लकी ठरले आहेत.भोसरी मतदारसंघातील आमदारांचे निकटवर्तीय असणाºया महिलेला संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. यापदासाठी भाजपाचे नगरसेवक शितल शिंदे, विलास मडेगिरी, शत्रुघ्न काटे, राहूल जाधव, प्रा. सोनाली गव्हाणे, निर्मला गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे.पन्नास जणांना संधीमहापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर सर्वांना स्थायी समितीवर काम करण्याची संधी देण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे लकी ड्रॉ पूर्वी भाजपाचे शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायीतील दहा सदस्यांचे राजीनामे घेतले होते. मात्र, या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे मंत्री काय निर्णय घेतात याकडे भाजपाच्या नगरसेवकांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे लकी ड्रॉमध्ये भाग्यवान ठरलेल्या भाजपाचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी, निर्मला कुटे यांना आपले काय होणार याची चिंता आहे.- स्थायी समितीवर सदस्यपदी भारतीय जनता पक्षातील नगरसेवकांमध्ये चूरस लागली असली तरी सभापती कोण होणार आणि पिंपरी, चिंचवड कि भोसरीला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. सध्याच्या सभापती या भोसरी विधानसभेतील होत्या. तसेच महापौर नितीन काळजे आणि पक्षनेते एकनाथ पवार हेही भोसरी विधानसभा मतदारसंघातीलच आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड