शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील गरजवंतांच्या मदतीला धावले चिंचवडकर.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 18:51 IST

शहरातील विविध भागात गोरगरीब, निराधार, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी व गरजवंत नागरिक या सर्वांना मदतीचा हात म्हणून दिवसातून दोनवेळा भोजन..

ठळक मुद्देअपर तहसीलदार गीता गायकवाड यांच्याकडून श्री काळभैरवनाथ उत्सव समितीला सन्मानपत्र

पिंपरी- चिंचवड: माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हे कृतीतून सत्यात उतरविण्याचा वसा चिंचवडकरांनी घेतला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजातील अस्थिरतेला मदतीचा हात देण्यासाठी समस्त चिंचवड कर पुढे सरसावले आहेत.लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सामाजिक उपक्रम राबविणारे चिंचवडकर आपल्या कायार्तून आगळा वेगळा ठसा उमटवित आहेत.रक्तदानाच्या शिबिरातून ३६० जणांचे रक्तदान करण्यात आले आहे.शहरातील विविध भागात गोरगरीब, निराधार, कामगार, कष्टकरी, विद्यार्थी व गरजवंत नागरिक आपल्या घरापासून वंचित झाले आहेत.या सर्वांना मदतीचा हात म्हणून दिवसातून दोन वेळा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.लॉक डाऊन सुरू झाल्यावर सुरवातीला २०० जणांचे भोजन चिंचवड गावातील धनेश्वर मंदिरात बनविले जात होते.आता सध्या आठ हजार फूड पॅकेट बनविण्यात येत आहेत.

पिंपरी शहरातील गरजूंना भोजन व्यवस्था करण्यात श्री काळभैरवनाथ उत्सव समितीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते स्वत:ची व समाजाची सुरक्षितता लक्षता घेऊन शहरातील विविध भागात नागरिकांची भूक भागवत आहेत.त्यांच्या या कार्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली आहे.अपर तहसीलदार गीता गायकवाड यांनी श्री काळभैरवनाथ उत्सव समितीला सन्मानपत्र देऊन गौरविले आहे.चिंचवड गावातील कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी या उपक्रमाला सुरवात केली.त्यांचे सामाजिक कार्य पाहून अनेकजण मदतीचा हात देत आहेत.नागरिकांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करावे व घरात राहून कोरोनाला हद्दपार करायचे हे धोरण अवलंबले आहे.कोणीही पोटाची भूक भागविण्यासाठी घराबाहेर येऊ नये यासाठी हे कार्यकर्ते घरपोच जेवणाची सेवा देत आहेत. या कार्याला पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालय व चिंचवड पोलिसांचे सहकार्य मिळत आहे.

ज्या गरजूंना जेवणाची अडचण आहे त्यांनी चिंचवड गावातील काळभैरवनाथ उत्सव समितीशी अथवा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस