शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गैरव्यवहाराची होणार चौकशी, मुख्यमंत्र्यांचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 06:10 IST

महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

पिंपरी : महापालिकेच्या स्थायी समितीने एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी दिली. त्यात रिंग झाली असून, ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाने लाटला, असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. या आरोपामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने खासदार अमर साबळे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.महापालिकेतील राष्टÑवादी काँग्रेस पक्षाची १५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता काबीज केली. ‘भय व भ्रष्टाचारमुक्तीचा’ असा नारा देऊन निवडणूक लढलेल्या भाजपाच्या पदाधिकाºयांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेत लूट सुरू आहे. सत्ता आल्यापासून पदाधिकारी, आमदार, खासदार, तसेच जुने-नवे कार्यकर्ते यांच्यात धूसफूस सुरूच आहे. ठेकेदारांची बिले देताना तीन टक्के रक्कम दिल्याशिवाय बिले मिळणार नाहीत, अशी अडवणूक केल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे गेली होती. या तक्रारीने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर भाजपाच्या सल्लागार नियुक्तीच्या विषयाला जोरदार आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर स्थायी समिती सभेत एकाच वेळी ४२५ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. त्यात विशिष्ट ठेकेदारांना डोळ्यासमोर ठेवून रिंग करण्यात आली. ९० कोटींचा मलिदा सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी हडप केला. महापालिकेचे १०० कोटींचे नुकसान केले, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला. हा मुद्दा ऐरणीवर येताच, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, प्रशांत शितोळे यांनीही भाजपाचे रिंग प्रकरण चव्हाट्यावर आणले. खासदार श्रीरंग बारणे व शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही आरोप केला होता.असे आहे खासदारांचे पत्रना खाऊंगा ना खाणे दुँगा, असे पंतप्रधानांचे धोरण आहे. मुख्यमंत्री म्हणून आपलीही स्वच्छ व पारदर्शक कारभाराची प्रतिमा आहे. या प्रतिमेला तडा देण्याचे काम महापालिकेतील पदाधिकारी करीत आहेत. स्थायी समितीच्या ४२५ कोटीच्या निविदा प्रक्रियेत रिंग करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे पक्षाची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे पक्षावर होणाºया आरोपांची दखल घ्यावी, असे पत्र खासदार साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्याची दखल घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयुक्त हर्डीकर यांना चौकशी करून अहवाल पाठवावा, असा आदेश दिला.लवकरच अहवाल पाठविणारमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून चौकशी अहवाल सादर करण्याबाबतचे पत्र आले असल्याच्या वृत्तास महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दुजोरा दिला. खासदार अमर साबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. त्या पत्राचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. रस्ते विकासाच्या ४२५ कोटींच्या रिंग प्रकरणाबाबत चौकशी करून राज्य शासनाला अहवाल पाठवावा, असे आदेशात म्हटले असून लवकरच हा अहवाल मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येईल, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस