शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

गटबाजी, कुरघोड्या शमविण्याचे आव्हान

By admin | Updated: June 8, 2015 05:20 IST

शहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे.

पिंपरी-चिंचवड - वार्तापत्रविश्वास मोरेशहरपातळीवरील अंतर्गत हेवेदावे, कुरघोड्या, गटबाजी शमविण्याचे मोठे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षासमोर आहे. हे अंतर्गत हेवेदावे आणि गटबाजी मोडीत काढण्यात पक्षांच्या नेत्यांना यश मिळाले नाही, तर येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत वैयक्तिक राजकारणाचा फटका पक्षास बसल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या शहराध्यक्षांना स्थानिक नेते, कार्यकर्ते, विविध गटांची मोट बांधण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. पक्षप्रमुखांनाही या शहरात जातीने लक्ष द्यावे लागणार आहे. विविध प्रांतातील लोकांमुळे शहरास मिनी इंडिया म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. मात्र, प्रमुख पक्षांचे राजकारण स्थानिक नेत्यांभोवती फिरत असते. विकासाऐवजी गावकी-भावकी, नातीगोती, व्यक्तिद्वेषाचे राजकारण केले जाते. पक्षाला मोठे न मानता एकमेकांना शह देण्याची फोफावलेली वृत्ती यामुळे शहरातील प्रमुख पक्षांत मतभेद उफाळून येण्याचा अनुभव शहरवासीयांना येतो. त्यामुळे भविष्यात स्थानिक नेत्यांना कार्यपद्धती बदलावी लागणार आहे. २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांना जोर लावावा लागेल. कठोर भूमिका घेण्याची गरजमहापालिकेत राष्ट्रवादीची एकमुखी सत्ता आहे. मात्र, वर वर दिसणारे हे चित्र तितकेसे खरे नाही. बंडखोर वृत्तीला प्रोत्साहन देण्याचा पॅटर्न आता बदलावा लागणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना स्थानिक पातळीवरील गटबाजी मोडीत काढण्यासाठी कठोर व्हावे लागणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप भाजपात गेल्याने चिंचवडमधील राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. भाजपला ती मिळाली आहे. माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे हेही कमालीचे नाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादीचे नगरसेवक आमदार महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून यश मिळविले. त्यामुळे ते नक्की भाजपबरोबर की राष्ट्रवादीबरोबर हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे वर वर दिसत असलेली राष्ट्रवादीची ताकत कमी झाली आहे. जगतापांना शह देण्यासाठी राष्ट्रवादीने संजोग वाघेरे यांना शहराध्यक्षपद दिले, अशी चर्चा शहरात आहे. मात्र, राष्ट्रवादीतील बंडखोर वृती थोपविण्यासाठी, सक्षम नेतृत्व म्हणून सिद्ध करण्यासाठी वाघेरे यांना मेहनत घ्यावी लागणार आहे. स्थानिक नेत्यांची एकजूट करण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे. आमदार जगतापांच्या रूपाने सक्षम असे नेतृत्व भाजपला मिळाले आहे, तसेच राज्यसभेच्या माध्यमातून ज्येष्ठ कार्यकर्ते अमर साबळे यांना संधी मिळाली आहे. सचिन पटवर्धन यांनाही राज्य मंत्रिपदाचा दर्जा असणारे पद मिळाले आहे. त्यामुळे भाजपमध्ये कमालीचा उत्साह आहे. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेमध्ये फारसा उत्साह नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सोडून इतर पक्षांना आपली ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.-----------ताकत देण्याची गरजएकेकाळी वर्चस्व असणाऱ्या काँग्रेसची महापालिकेतील सध्याची अवस्था गंभीर होत आहे. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर येथील काँग्रेसला कोणीही वाली राहिलेला नाही. मोरे सरांनंतर सत्ता असूनही विविध मंडळे, प्राधिकरण यावरून कोणतीही मोठी पदे दिली गेली नाही. त्यामळे कार्यकर्ते नाराज आहेत. परिणामी पक्ष वाढण्याऐवजी ताकत कमी होत चालल्याचे दिसून येते. राज्य किंवा देश पातळीवरील नेत्यांनी या शहराकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गटबाजी, आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरूच आहे. गटबाजी, हेवेदावे कमी झालेले नाहीत. माजी शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर आणि शहराध्यक्ष सचिन साठे यांच्यातील शाब्दिक जुगलबंदी थांबलेली नाही.