शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

चाकणमधील जनावरांच्या बाजाराची दुरवस्था, पावसामुळे बाजारात गाळचगाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 15:12 IST

खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील जनावरांच्या बाजारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ झाला असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अशा राड्यातच उभे राहून जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

चाकण : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील जनावरांच्या बाजारात पावसामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ झाला असून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना अशा राड्यातच उभे राहून जनावरे विकण्याची वेळ आली आहे. बाजाराची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी व्यापारी व शेतकऱ्यांनी केली आहे. ही कामे सर्व संचालक मंडळाला विश्वासात घेऊन लवकरात लवकर करण्याचे आश्वासन सभापती चंद्रकांत इंगवले यांनी दिले आहे. मात्र सचिवांचा मनमानी कारभार व पदाचा दुरुपयोग करून, चुकीचे धोरण राबवून काम केल्यास माझा विरोध राहील, असा इशारा संचालक राम महादू गोरे यांनी दिला आहे.  

शनिवारी (14 जुलै) भरलेल्या जनावरांच्या बाजारात पावसाच्या पाण्याने गाळ होऊन राडा झाला होता. काही खोलगट ठिकाणी पाणीही साचले होते. त्यामुळे जनावरे खरेदी-विक्रीसाठी आलेल्या व्यापारी व शेतकऱ्यांना गाळात ताटकळत उभे राहून मनस्ताप सहन करावा लागला. बाजारातून चालताना सगळा गाळ अंगावर उडत आहे. पावसामुळे झालेल्या राड्याने बाजारातील सगळे रस्तेच चिखलमय व निसरडे झाले आहेत. अशा रस्त्यावरून जाताना अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा आला कि या समस्येला दरवर्षी सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे गुरांच्या खरेदी-विक्रीवर परिणाम होत आहे. या बाजारात काँक्रिटीकरण करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शेतकरी व व्यापारी करत असतानाही हे काम अद्याप का होत नाही? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. शेतकरी व व्यापारी वर्गात याबाबत मोठी नाराजी आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी सभापती चंद्रकांत इंगवले यांची भेट घेऊन बाजारातील समस्या मांडल्या असून या समस्या सर्वांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन त्यांनी दिले. याबाबत सभापती चंद्रकांत इंगवले म्हणाले, “बाजार समितीच्या एका संचालकाने हरकत घेतल्याने काँक्रिटीकरण व बाजार आवारातील इतर कामे रखडली आहेत. सदर कामे संबंधित संचालकाच्या सर्व समस्या ऐकून घेऊन लवकरात लवकर सोडविण्याचा बाजार समिती प्रयत्न करणार आहे.” याबाबत संचालक राम महादू गोरे यांनी सभापती चंद्रकांत इंगवले यांच्याकडे सचिव सतीश चांभारे यांच्या संदर्भात लेखी तक्रार केली आहे. राम गोरे म्हणाले कि, “सचिव सतीश चांभारे हे पदाचा दुरुपयोग करून मनमानी कारभार करीत आहेत. जनावरांच्या बाजाराबाबत दिशाभूल करून चुकीचे ठराव करण्याचे काम सचिव करून घेत आहेत. चाकण नगरपरिषदेने येथे जनावरांचा बाजार भरवू नये असे पत्राद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासनाच्या १०० टक्के अनुदानातून रोहकल रोड या ठिकाणी खर्च केलेला आहे. तरीही सचिव चुकीचा विषय अजेंड्यावर घेऊन सर्व संचालकांना चुकीचा ठराव पास करण्यास भाग पाडत आहेत. त्यांस व उपबाजार आवारात म्हैस गोठे ऑफिससाठी गाळे बांधण्यास माझा विरोध आहे.” यासंदर्भात सचिव सतीश चांभारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.