शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

४२५ कोटींच्या निविदा रद्द करा - शिवाजीराव आढळराव पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 03:12 IST

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे सत्तर ते नव्वद कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या पुढाºयांनी व ठेकेदारांनी ४२५ कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. ४२५ कोटींच्या कामांसाठी केलेल्या निविदा प्रक्रियेतील रिंगमुळे जादा दराच्या निविदा भरल्याने सुमारे सत्तर ते नव्वद कोटींचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. जागा ताब्यात नसताना देखील कामाच्या वर्क आॅर्डर देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी या अगोदर संबंधित रस्ते कामाच्या निविदा त्वरित रद्द करावेत, अशी मागणी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.पिंपरी-चिंचवड महापालिकेने सव्वा चारशे कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामात संगनमत करून मोठा भ्रष्टाचार केल्याची जोरदार चर्चा आहे. या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप होत आहेत. त्यामुळे खासदारांच्या बैठकीत निविदा प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. पत्र देखील दिले होते. त्यामुळे आपण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश द्याल, अशी अपेक्षा होती. परंतु, तसे घडले नसल्याने पालिकेतील सत्ताधारी आणि आयुक्तांनी वर्क आॅर्डर कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे समजते.महापालिकेला लुटण्याची परंपरा कायमरस्ते विकासाच्या निविदा काढलेल्या अनेक जागा पालिकेच्या ताब्यात नाहीत. तसेच सव्वा चारशे कोटी रुपयांची चालू वर्षात आर्थिक तरतूद नसताना पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये करावयाच्या खर्चाच्या निविदा आता चालू आर्थिक वर्षात काढण्यात आल्या आहेत. सध्याच्या स्थायी समितीची मुदत पुढच्या महिन्यात संपत आहे. त्यामुळे घाईघाईने सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी जलद गतीने निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पालिकेत सत्तेवर भाजपा असली तरी त्यांच्या आडून राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या नगरसवेकांनी महापालिकेला लुटण्याची पूर्वीची परंपरा कायम ठेवल्याचा आरोप आढळराव यांनी केला आहे.

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड