शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी महापालिकेतील २८ लेखनिकांची बढती रद्द, खातेनिहाय चौकशीचे आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 15:24 IST

पिंपरी महापालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी वर्गातून लेखनिक पदावर बढती मिळविलेल्या ११७ कर्मचाऱ्यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले.

ठळक मुद्दे२८ कर्मचाऱ्यांनी बढतीवेळी खोट्या छायांकित सत्यप्रती सादर करुन फसवणूक केली, हे स्पष्टनियुक्ती आदेशातील अटी व शर्तींचा या कर्मचाऱ्यांनी भंग केल्याचे निष्पन्न

पिंपरी: महापालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी वर्गातून लेखनिक पदावर बढती मिळविलेल्या कर्मचाऱ्यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. त्यामुळे ११७ कर्मचाऱ्यांपैकी २८ लेखनिकांची बढती रद्द केली आहे, कर्मचाऱ्यांना चतुर्थश्रेणीत पदावनत करुन खातेनिहाय चौकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.  महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, सरकार दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचाऱ्यांची कमरतता जाणवत आहे. प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार लेखनीक पदावर बढती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग ४ मधील सुमारे ११७ कर्मचाऱ्यांना वर्ग ३ मधील लेखनीक पदावर बढती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसांपूर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे ११७ कर्मचाऱ्यांना झाला.  काही कर्मचाऱ्यांनी बढती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निदर्शनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांनी ही बढती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे मिळाली. त्यामुळे सर्वच कर्मचाºयांचे प्रमाणपत्र राज्य परीक्षा परिषदेकडे खातरजमा करून घेण्यासाठी पाठविली.  त्या कर्मचाऱ्यांचा अहवाल महापालिकेस मिळाला. मात्र, या अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी स्पष्ट माहिती परीक्षा परिषदेने दिली नाही. टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची अडचण आहे. त्यामुळे महापालिकेने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना दिलेल्या बढतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळ उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्यामुळे परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देऊन हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे, याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केली.     त्यानंतर महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद, पुणे यांचा तपासणी अहवाल मिळाला. त्यात २८ कर्मचाऱ्यांचे टंकलेखन प्रमाणपत्र अवैध असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्या कर्मचाठयांना मुळ टंकलेखन प्रमाणपत्र सादर करण्यास वारंवार सांगूनही त्यांनी प्रशासनाकडे प्रमाणपत्रे सादर केलेली नाहीत. महापालिकेच्या या २८ कर्मचाऱ्यांनी बढतीवेळी टंकलेखनाच्या खोट्या छायांकित सत्यप्रती सादर करुन महापालिकेची फसवणूक केली, हे स्पष्ट झाले. त्यामुळे नियुक्ती आदेशातील अटी व शर्तींचा या कर्मचाऱ्यांनी भंग केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या कर्मचाऱ्यांची लेखनीक पदावरील सेवा संपुष्टात आणली आहे. त्यांची बढतीपूर्वीच्या गट ड च्या मुळ पदावर वेतनश्रेणी पदावनत केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड