शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चाळकवाडी टोलनाका ग्रामस्थांनी केला बंद, जिल्हाधिका-यांना निवेदन, बेकायदा टोलवसुलीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 23:47 IST

चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

पिंपळवंडी : चाळकवाडी येथील टोलनाक्यावर रविवारी (दि. १७) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विविध मागण्यांसाठी आमदार शरद सोनवणे व चाळकवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या वेळी नागरिकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत टोलनाका बंद ठेवण्याची मागणी करत टोलनाक्याचे कामकाज बंद करण्यात आले. याबाबत विविध मागण्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिका-यांना पाठविण्यात आले आहे.पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी टोलनाका २१ फेब्रुवारी २०१७ ला सुरू करण्यात आल्यामुळे वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त केली जात होती. परंतु राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महामार्गांचे काम ८० टक्के पूर्ण झाले असून, नियमानुसार टोलनाका सुरू करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यावेळी नागरिकांनी हा टोलनाका सुरू करण्यास काही नागरिकांनी विरोध केला होता. पुणे-नाशिक महामार्गाचे आळेखिंड ते राजगुरुनगर या दरम्यान असलेली बाह्यवळणे व पुलाची कामे अद्यापही अर्धवट स्थितीत आहेत, तर अनेक शेतकºयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. ज्या ठिकाणी जुन्या महामार्गाचा वापर होत आहे, त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत हे खड्डे वाचविण्याच्या प्रयत्नात एखाद्याचा बळी जाऊ शकतो, असे असतानाही टोल प्रशासनाने टोलनाका सुरू करून टोलवसुली सुरू केली होती. येथील शेतकºयांनी हा टोलनाका करण्यास सुरुवातीपासूनच विरोध केला होता. परंतु येथील स्थानिक शेतक-यांचा विरोध डावलून हा टोलनाका सुरू करण्यात आला. हा टोलनाका सुरू झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील नागरिकांना टोलमधून वगळण्यात आले होते. मात्र, स्थानिक नागरिकांकडूनही टोलवसुली सुरू करण्यात आल्यामुळे स्थानिक वाहनचालकांनीही यास विरोध केला होता. सहा महिने होऊनही आश्वासन पाळले गेले नसल्यामुळे आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी आंदोलन करून टोलनाका बंद केला.बाधित शेतक-यांचे नुकसानभरपाईचे पैसे न्यायालयात गेले असल्यामुळे अजूनही त्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. तसेच, महामार्गाची अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून, ही कामे पूर्ण झाल्याशिवाय व बाधित शेतक-यांना नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय टोलनाका सुरू करून देणार नाही.- शरद सोनवणे, आमदार, जुन्नर तालुकाटोलनाका प्रशासनाने चाळकवाडी ग्रामस्थ व बाधित शेतक-यांचे प्रश्न तीन महिन्यांमध्ये सोडविण्याचे आश्वासन टोलनाका प्रशासनाने दिले होते. मात्र, सहा महिने होऊनही हे आश्वासन पाळले गेले नाही,, त्यामुळे आम्हा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागत आहे.- प्रदीप चाळक, बाधित शेतकरीटोलनाक्याचे काम करत असताना महामार्गाच्या कडेला गटारे न काढल्यामुळे पावसाचे पाणी घरात जात आहे, तर टोलनाक्याजवळ साचणारे पावसाचे पाणी शेतात काढून दिल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे, त्यामुळे आमच्या अडचणी दूर झाल्यानंतरच टोलनाका सुरू केला जाईल.- अर्चना संजय चाळक, बाधित शेतकरीआमची घरे महामार्गालगत असल्याने वाहनांच्या ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे त्रास होत आहे, तसेच माझ्या हॉटेलची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसल्यामुळे दुसरा व्यवसाय सुरू करू शकत नाही, त्यामुळे आमच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बंद झाले आहे, जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत टोलनाका सुरू करून देणार नाही.- योगेश चाळक, बाधित शेतकरी