शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये सक्ती साहित्य खरेदीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 06:28 IST

शहरातील काही खासगी शाळांकडून पालकांची अक्षरश: लूट सुरू आहे. अ‍ॅडमिशन फी, डोनेशन यातून भरमसाट पैसे उकळले जात आहेत.

मंगेश पांडेपिंपरी : शहरातील काही खासगी शाळांकडून पालकांची अक्षरश: लूट सुरू आहे. अ‍ॅडमिशन फी, डोनेशन यातून भरमसाट पैसे उकळले जात आहेत. यासह आता शैक्षणिक साहित्य व गणवेश शाळेमार्फतच खरेदी करण्याची सक्ती केली जात असून, यामध्ये मूळ दरापेक्षा अधिक किमती लावल्या जात असल्याने पालकांचा खिसा रिकामा करण्याचा उद्योग काही शाळांकडून सुरू आहे. एकप्रकारे शाळेतच साहित्यविक्रीचे दुकान मांडल्याचे दिसून येत आहे.सध्या नर्सरी ते नवीन इयत्तेत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, विद्यार्थ्याला आवश्यक असणारी प्रत्येक वस्तू शाळेमार्फतच खरेदी करावी, अशा सक्त सूचनाच शाळाप्रशासनाने पालकांना दिल्या आहेत. शाळेचा गणवेश, कंबर पट्टा, टोपी, वह्या, पुस्तके, दप्तर, जेवणाच्या डब्याची पिशवी आदी वस्तूंचा यामध्ये समावेश आहे. मात्र, ही साहित्यविक्री करीत असताना मूळ दरापेक्षा अधिकच्या दरात विक्री केली जाते. यामुळे पालकांची अक्षरश: आर्थिक लूट होत आहे. शैक्षणिक साहित्याच्या दराबाबत पालकांनी विचारण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही निश्चत केलेल्याच विक्रेत्याकडून साहित्य घ्यावे लागेल, ते शक्य नसल्यास या शाळेत प्रवेश घेऊ नका, अशी उद्धटपणे उत्तरे दिली जातात.पालकांना केली जातेय सक्ती१वह्या, दप्तर आदी साहित्य परवडणाऱ्या किमतीत इतर दुकानांमधून खरेदी करण्यासाठी पालक तयार असतानाही शाळेकडून संंबंधित दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे. शाळांच्या अशा प्रकारच्या मनमानीमुळे पालकांच्या खिशाला झळ बसत आहे.बाजारभावापेक्षा भरमसाट किमती२शाळांनी सांगितलेल्या दुकानदाराकडून दरापेक्षा अधिकचे दर आकारले जात आहेत. एखाद्या वहीची किंमत ३५ रुपये असल्यास यामध्ये सुमारे दहा रुपयांनी वाढ करून ४५ रुपये दर आकारला जातो. अशा वेळी पालकाकडे नुकसान सहन करून वही खरेदी करण्याशिवाय पर्याय नसतो.पालकांना भरतेय धडकी३नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच पालकांना अक्षरश: धडकीच भरते. शाळेचे प्रवेश शुल्क, डोनेशन, शैक्षणिक साहित्य खरेदी यावर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. यामुळे कुटुंबाचे आर्थिक नियोजन कोलमडते. अशातच शालेय वस्तूंवर अधिकचे दर आकारले जात असल्याने खर्च करताना पालकांचे कंबरडे मोडत आहे.शिक्षण विभागाचा नाही अंकुश४खासगी शाळांकडून पालकांची आर्थिक लूट केली जात आहे. मात्र, तसे होत नसल्याने पालकही हैराण झाले आहेत. शिक्षण विभागाचे अधिकारी तक्रार केल्यानंतरच कारवाई करतात. मात्र, पालक तक्रारीसाठी पुढे येत नाहीत.