शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

एकाची ठेव पावती दुसऱ्याच्या कर्ज खात्यात वर्ग करण्याचा उद्योग ; 'बीएचआर' पतसंस्थेतला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 14:13 IST

प्रतिज्ञापत्रावर सुरू आहे कारभार, ठेवीदार संघटनेचा विरोध

ठळक मुद्देरिझर्व्ह बँकेकडून पतसंस्थेवर १६०० कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी कारवाई

पिंपरी : गेल्या काही वर्षांपासून भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत हजारो खातेदारांचे पैसे अडकले आहेत. ज्यांच्या पत संस्थेत ठेवी आहेत त्यांना दुसऱ्याच्या कर्ज खात्यात प्रतिज्ञापत्रावर पैसे भरण्याची मुभा दिली जात आहे. या प्रकारामध्ये मूळ ठेवीदाराच्या हाती तीस पस्तीस टक्के रक्कम थोपवली जात असल्याचा आरोप बीएचआर ठेवीदार समितीने केला आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) बीएचार संस्थेवर १६०० कोटी रुपयांच्या अनियमिततेसाठी अवसायनाची कारवाई केली आहे. बँकेच्या राज्यभरात विविध ठिकाणी २६४ शाखा आहेत. बँकेवर ऑक्टोबर २०१५ साली अवसायकाची नेमणूक करण्यात आली. ठेवीदारांचे पतसंस्थेत कोट्यवधी रुपये अडकले आहेत. त्यामुळे एखाद्या ठेवीदाराचे पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात भरुन घेतले जात आहे. त्यासाठी प्रतिज्ञा पत्राचा आधार घेतला जात आहव. जनसंग्रामचे संस्थापक व ठेवीदार समितीचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठेवीदार समितीचे सचिव दीपक मांडोळे, शिवराम चौधरी, खेमचंद्र पाटील व सतिश राणे यांच्या शिष्टमंडळाने बीएचआर संस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांची भेट घेऊन कर्ज खात्यावर इतर ठेवीदारांचे पैसे वर्ग करू नका अशी मागणी केली. ठेवीदारांना शेकडा तीस ते ३५ रुपये देऊन त्यांचे पैसे कर्ज खात्यात वर्ग करून ठेवीदारांची लूट केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला.

ठाकरे म्हणाले , पतसंस्थेकडे ठेवीदारांच्या सातशे कोटी रुपयांच्या ठेवी असून, तितकीच कर्ज आहेत. त्यातील पाचशे कोटींहून अधिक कर्ज चांगली आहेत. शिवाय कर्जावर व्याजासह पैसे मिळतील. दोषी संचालकांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. सांचालकांनी त्या प्रमाणे पैसे न भरल्यास त्यांना जामीन मिळणार नाही. त्यामुळे ठेवीदारांनी थोडा संयम बाळगावा. कोणाच्याही प्रलोभनाला बळी पडून आपल्या ठेवी नुकसान सोसून देऊ नका. ----------काय आहे कर्ज वर्ग करण्याचे प्रतिज्ञा पत्र

ठेवीदाराला आपल्या ठेवींचा सर्व तपशील, ठेव पावती क्रमांक, त्याची रक्कम प्रतिज्ञा पत्रात नमूद करावी लागते. या ठेवी अमुक व्यक्तीच्या कर्ज खात्यात भरण्यास अथवा वर्ग करण्यास हरकत नसल्याचे शपथ पत्रात नमूद करावे लागते. ठेवीदारांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन हे व्यवहार केले जात असल्याचा दावा ठेवीदार समितीने केला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडbankबँकReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकfraudधोकेबाजी