पिंपरी : घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना निगडी पोलिसांनी गजाआड केले. त्यांच्याकडून १ किलो सोने, एक मोटार, दुचाकी असा ४२ लाख ६ हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. निळकंठ सूर्यकांत राऊत (वय ३६, रा. रुपीनगर, तळवडे), हर्षद गुलाब पवार (वय २३, रा. पिरंगुट, ता. मुळशी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. निगडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. आरोपी निळकंठ याने त्याच्या साथीदारासह प्राधिकरण निगडी येथे घरफोडी केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे घरफोडीविषयी विचारणा केली असता आपला साथीदार हर्षद याच्यासोबत घरफोडी केल्याची कबुली त्याने दिली. आरोपींनी खोटी नावे धारण करून कागदपत्रे तयार केली होती.
घरफोड्या करणारे चोरटे गजाआड
By admin | Updated: February 12, 2017 05:11 IST